फोटो सौजन्य: Social Media
देशभरात इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. ग्राहक सुद्धा वाढत्या पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किंमतींना कंटाळून इलेक्ट्रिक कार्स विकत घेत आहे. येणार काळ सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे कारपासून बाइकपर्यंत, सगळीच वाहनं आता इलेक्ट्रिक होत आहे.
ग्राहकांना आपल्या इलेक्ट्रिक कार्सकडे आकर्षित करण्यासाठी अनेक ऑटो कंपनीज जबरदस्त डिसॉकन्ट्स देत असतात. चायनीज कार उत्पादक कंपनी BYD आपल्या इलेक्ट्रिक कारवर आकर्षक सवलती देत आहे. बीवायडी सील या ईव्हीवर 2.5 लाख रुपयांचे डिस्काउंट दिले जात आहेत. BYD सील डायनॅमिक, प्रीमियम आणि परफॉर्मन्स या तीन व्हेरियंटसह बाजारात उपलब्ध आहे. या तीन व्हेरियंटसह, त्याच्या इलेक्ट्रिक मॉडेलवर कॅश डिस्काउंट देखील उपलब्ध आहे. चला या डिस्काउंट ऑफरबद्दल अधिक जाणून घेऊया.
हे देखील वाचा: Mahindra Scorpio Classic Boss Edition लाँच, जाणून घ्या किंमत आणि बरंच काही
बीवायडी सीलवर 2 लाख रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट दिले जात आहे. विशेषत: त्याच्या प्रीमियम व्हेरियंटवर 50 हजार रुपयांची कॅश डिस्काउंट दिले जात आहे. या सणासुदीच्या हंगामात, BYD सीलच्या टॉप-स्पेक परफॉर्मन्स व्हेरियंटची किंमत 2 लाख रुपयांनी कमी करण्यात आली आहे. या कंपनीच्या इलेक्ट्रिक सेडानवरही मोठे डिस्काउंट दिले जात आहेत. या कारवर 50 हजार रुपयांपर्यंतचे मेन्टेनन्स पॅकेजही उपलब्ध आहे.
BYD सीलचे अपडेटेड मॉडेल 800V प्लॅटफॉर्मवर आधारित आहे, ज्याद्वारे या कारची कार्यक्षमता सुधारली गेली आहे. चिनी लक्झरी ऑटोमेकरचा असा दावा आहे की या कारचा टॉप-एंड व्हेरियंट केवळ 3.8 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकतो. या BYD कारचा टॉप स्पीड 240 kmph आहे. ही कार दोन बॅटरीच्या क्षमतेसह येते. या बॅटरी पॅकसह, ही कार 510 किलोमीटर ते 650 किलोमीटरची रेंज देण्याचा दावा करते.
हे देखील वाचा: Maruti Suzuki च्या कार्सचा विक्रीमध्ये दबदबा! ‘ही’ कार ठरतेय ग्राहकांची पहिली पंसत
BYD सीलचा डायनॅमिक व्हेरियंट एकाच चार्जिंगमध्ये 510 किलोमीटरची रेंज ऑफर करतो. हा व्हेरियंट रियर व्हील ड्राइव्ह सिस्टमसह येतो. ऑफरशिवाय या कारची एक्स-शोरूम किंमत 41 लाख रुपये आहे. ही कार प्रीमियम व्हेरियंटमध्ये 650 किलोमीटरची रेंज देते. याचे एक्स-शोरूम किंमत 45.55 लाख रुपये आहे.
BYD सील परफॉर्मन्स व्हेरियंटसह एका चार्जमध्ये 580 किलोमीटर अंतर कापू शकते. हे मॉडेल ऑल-व्हील ड्राइव्हच्या कार्यासह येते. या कारची एक्स-शोरूम किंमत 53 लाख रुपये आहे.