फोटो सौजन्य: iStock
देशभरात सणासुदीचा काळ चालू झाला आहे. या शुभ काळात अनेक जण नवीन गोष्टी खरेदी करण्यासाठी बाहेर पडत असतात. तसेच कित्येक जण या काळात नवीन कार घेताना दिसतात. यामुळेच अनेक ऑटो कंपनीज आपल्या कार्सवर आक्रश सूट देत असतात, तसेच नवीन कार्स मार्केटमध्ये लाँच करत असतात.
महिंद्रा अँड महिंद्राच्या कार्स देशभरात चांगल्याच लोकप्रिय आहेत. कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना हाय परफॉर्मन्स असणाऱ्या कार्स उपलब्ध करून देत असतात. नुकतेच कंपनीने स्कॉर्पिओचे क्लासिक बॉस एडिशन लाँच केले आहे. या नवीन स्कॉर्पिओमध्ये काही खास बदल पाहायला मिळतील, ज्यामुळे ती इतरांपेक्षा वेगळी दिसेल. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
हे देखील वाचा: पेट्रोल कारला पूर्णतः सीएनजी कार बनवायचे आहे का? मग फॉलो करा ‘या’ स्टेप्स
महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक बॉस एडिशन इतरांपेक्षा वेगळे बनवण्यासाठी कंपनीकडून काही बदल करण्यात आले आहेत. याला फ्रंट ग्रिल, हेडलाइट्स, फॉग लाइट्स, बोनेट स्कूप, डोअर हँडल आणि मागील टेल लाइट्सभोवती डार्क क्रोम मिळतो. यात सिल्व्हर स्किड प्लेटसह फ्रंट बंपर एक्स्टेन्डर देखील आहे. यासोबतच बॉस एडिशनमध्ये डोअर व्हिझर आणि रिअर बंपर प्रोटेक्टर यांसारख्या इतर ॲक्सेसरीज बंडल देखील देण्यात आल्या आहेत.
या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात मागील पार्किंग कॅमेरा, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोलसह 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. स्टँडर्ड स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये रेड रेज, नेपोली ब्लॅक, डीसॅट सिल्व्हर, पर्ल व्हाइट आणि गॅलेक्सी ग्रे 5 कलर ऑप्शन आहेत. तसेच, एलईडी प्रोजेक्टर लाइट्स, फॉग लॅम्प आणि अन्य फीचर्स समाविष्ट आहेत.
हे देखील वाचा: हे PDI म्हणजे काय आणि नवीन वाहनांसाठी ते का असते महत्वाचे?
Mahindra Scorpio Classic Boss Edition मध्ये 2 mHawk 2.2L डिझेल इंजिन आहे, जे 130 hp ची पॉवर आणि 300 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. ही स्कॉर्पिओ त्याच्या सेगमेंटमधील इतर कॉम्पॅक्ट एसयूव्हीशी स्पर्धा करेल.
ही स्पेशल एडिशन स्कॉर्पिओ दोन व्हेरियंटमध्ये ऑफर केली जात आहे. त्याच्या बेस क्लासिक S ची किंमत रु. 13.62 लाख असू शकते आणि Scorpio Classic S11 ची किंमत रु. 17.42 लाख असू शकते.