फोटो सौजन्य: iStock
भारतात कार खरेदीत वाढ होताना दिसत आहे. तसेच ग्राहकांच्या मागणीत सुद्धा बदल होताय, यानुसार अनेक वाहन उत्पादक कंपन्या विविध फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या कार लाँच करत आहे. अशातच जर तुम्ही सुद्धा नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मग येत्या काही काळातच नवीन कार लाँच होणार आहेत.
भारतातील अनेक मोठ्या कंपन्या आता दिवाळी 2025 पूर्वी अनेक नवीन एसयूव्ही मॉडेल्स लाँच करण्याची तयारीत आहे. जर तुम्ही या दिवाळीत एक नवीन आणि स्टायलिश एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खालील 5 बहुप्रतिक्षित एसयूव्हींबद्दल नक्की विचार करा.
Honda च्या ‘या’ बाईकचा मार्केटमध्ये धूम धडाका ! रोज 5000 ग्राहक करताय खरेदी, किंमत फक्त…
महिंद्रा कंपनीची प्रसिद्ध कॉम्पॅक्ट एसयूव्ही बोलेरो निओ आता नवीन रूपात परतणार आहे. याचे फेसलिफ्ट व्हर्जन 15 ऑगस्ट 2025 रोजी लाँच केले जाईल. ही एसयूव्ही महिंद्राच्या नवीन फ्रीडम एनयू प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल, जे या कारला ड्रायव्हिंगचा चांगला अनुभव देखील देईल.
खरं तर, या नवीन बोलेरो निओमध्ये राउंड हेडलाइट्स, नवीन बंपर डिझाइन आणि स्टायलिश फॉग लॅम्प असतील. मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, नवीन डॅशबोर्ड लेआउट आणि नवीन सीट अपहोल्स्ट्री सारख्या आधुनिक फीचर्ससह या एसयूव्हीच्या इंटिरिअरमध्येही मोठा बदल दिसून येईल.
Office ला जाणाऱ्या मुलींसाठी ‘या’ Electric Scooter आहे एकदम बेस्ट, ट्रॅफिकमध्ये सुद्धा फटाफट धावेल
या दिवाळीत मारुती सुझुकी त्यांची नवीन मध्यम आकाराची एसयूव्ही एस्कुडो लाँच करणार आहे. ही एसयूव्ही ग्रँड विटाराच्या प्लॅटफॉर्मवर बेस्ड असेल, परंतु आकाराने थोडी मोठी आणि किमतीत थोडी अधिक किफायतशीर असेल.
एरिना डीलरशिपद्वारे विकली जाणारी ही एसयूव्ही विशेषतः अशा ग्राहकांना लक्ष्य करेल, ज्यांना अधिक फीचर्ससह आणि चांगल्या किमतीत विश्वासार्ह एसयूव्ही हवी आहे. ही एसयूव्ही पेट्रोल, सीएनजी आणि हायब्रिड इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाण्याची अपेक्षा आहे. जर तुम्हाला एक पॉवरफुल आणि बजेट-फ्रेंडली मिड साइझ एसयूव्ही हवी असेल, तर एस्कुडो तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन ठरू शकतो.
Hyundai Venue चे नवीन फेसलिफ्ट व्हर्जन देखील दिवाळीपूर्वी बाजारात येणार आहे. ही SUV भारतात आधीच खूप लोकप्रिय आहे आणि आता त्याचे अपडेटेड व्हर्जन याला अधिक आकर्षक बनवेल. नवीन Venue मध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, मोठी इन्फोटेनमेंट सिस्टम आणि ADAS सारखे सेफ्टी फीचर्स असण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्स त्यांच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या मायक्रो एसयूव्ही पंचचे फेसलिफ्ट व्हर्जन आणि त्यांच्या इलेक्ट्रिक व्हर्जन, पंच ईव्ही येत्या ऑक्टोबर 2025 मध्ये लाँच करू शकते. आयसीई व्हर्जनमध्ये पंच ईव्हीपासून प्रेरित डिझाइन घटकांचा समावेश असेल, ज्यामुळे ते अधिक फ्यूचरिस्टिक दिसेल.
इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर, त्यात मोठी टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि काही नवीन फीचर्स समाविष्ट असू शकतात जी पूर्वी फक्त अल्ट्रोझ आणि नेक्सॉनमध्ये दिसली होती.