फोटो सौजन्य: @honda2wheelerin (X.com)
भारतीय मार्केटमध्ये नेहमीच बजेट फ्रेंडली बाईकला चांगली मागणी मिळताना दिसते. ग्राहक देखील अशा बाईकच्या शोधात असतात जी त्यांना स्वस्त किमतीत उत्तम मायलेज देईल. हीच मागणी लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट बजेट फ्रेंडली बाईक ऑफर करत असतात.
अनेक वर्षांपासून Honda दुचाकी विभागात बाईक आणि स्कूटर ऑफर करत आहे. कंपनीने अनेक अफोर्डेबल बाईक ऑफर केल्या आहेत. Honda Shine 100 ला तर ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
Hero Splendor नंतर, होंडा शाइन ही भारतीय मार्केटमधील सर्वोत्तम परवडणारी मायलेज बाईक म्हणून ओळखली जाते. या बाईकच्या विक्रीच्या आकडेवारीवरून तुम्ही या बाईकची लोकप्रियता मोजू शकता. गेल्या महिन्यात 1,43,218 नवीन ग्राहकांनी ही बाईक खरेदी केली होती, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ दर्शवते.
Office ला जाणाऱ्या मुलींसाठी ‘या’ Electric Scooter आहे एकदम बेस्ट, ट्रॅफिकमध्ये सुद्धा फटाफट धावेल
Honda Shine 100 ची किंमत सुमारे 67 हजार रुपये एक्स-शोरूम आहे. होंडा शाइनच्या 2025 मॉडेलमध्ये पूर्णपणे डिजिटल डॅश बसवण्यात आला आहे. ही बाईक बजेट रायडर्ससाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते.
अपडेटसह, रिअल टाइम मायलेज इंडिकेटर आणि डिस्टन्स टू एपीटीआय डिस्प्ले सारखे अनेक नवीन फीचर्स जोडले गेले आहेत. या होंडा बाईकमध्ये डॅशजवळ यूएसबी-टाइप सी पोर्ट बसवण्यात आला आहे, ज्यामुळे बाईकवर प्रवास करतानाही मोबाईल फोन सहज चार्ज करता येतो.
‘या’ आहेत भारतातील 5 सर्वात स्वस्त कार, किंमत 4.23 लाखांपासून सुरु; मायलेज तर एकदमच झकास
होंडा शाइनमधील इंजिन देखील अपडेट करण्यात आले आहे. त्यात नवीनतम OBD-2B नॉर्म्स जोडले गेले आहेत. परंतु इंजिन अपडेट केल्यानंतरही ते पूर्वीसारखेच पॉवर आणि टॉर्क देते. या बाईकमध्ये 4-स्ट्रोक, SI, BS-VI इंजिन आहे, जे 7,500 rpm वर 7.9 kW पॉवर देते आणि 6000 rpm वर 11 Nm टॉर्क जनरेट करते.
होंडा शाइन 125 चे ARAI प्रमाणित मायलेज 55 kmpl आहे. या बाईकमध्ये 10.5 लिटरचे फ्युएल टॅंक क्षमता आहे, ज्यामुळे एकदा टॅंक भरली की, ही बाईक सुमारे 575 किमी सहज चालवता येते. तर होंडा शाइन 100 मध्ये 10-लिटर फ्युएल टॅंक मिळते, जी भरल्यावर 700 किमी पर्यंत सहज प्रवास करू शकते. मात्र, बाईकचा मायलेज रायडिंग परिस्थिती, ट्रॅफिक आणि मेंटेनन्सवर अवलंबून असते.