Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E- Bike Accessories: ई-बाईक रायडर्ससाठी हे ७ गॅजेट्स ठरतील अत्यंत उपयुक्त; पाहा युझर्सनी पसंत केलेल्या टॉप अ‍ॅक्सेसरीज!

ग्लोबल मार्केटमध्ये ई-बाईक्सची लोकप्रियता प्रचंड वेगाने वाढत असून दैनंदिन प्रवासासाठी अनेकजण सायकलींना पसंती देत आहेत. मात्र, या वाढत्या वापरासोबतच सायकलींच्या अपघाताचा धोका आणि चोरीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. योग्य अ‍ॅक्सेसरीज वापरल्यास रायडरची सुरक्षा वाढण्यासोबतच सायकल चोरीला जाण्यापासून सहज वाचवता येते. ग्राहक पुनरावलोकनांनुसार (User Reviews) बसवायला सोपे आणि प्रत्यक्षात उत्तम कामगिरी करणारे ७ अत्यंत उपयुक्त ई-बाइक अ‍ॅक्सेसरीज खालीलप्रमाणे आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 24, 2026 | 11:00 AM
Follow Us
Follow Us:
1 / 7

जॉयरुम बाइक फोन माउंट (JOYROOM Bike Phone Mount) हा फोन माउंट वापरण्यास सोपा आणि मजबूत असून यामध्ये ३६०-डिग्री रोटेशन मिळते. या फोन माउंटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला दिलेली शेड (Sun Visor). कडक उन्हात फोन स्क्रीनवर पडणारा सूर्यप्रकाश रोखून नेव्हिगेशन सहज पाहता येते आणि लांबच्या प्रवासात फोन ओव्हरहीट होण्यापासून वाचतो.

2 / 7

व्हिटीटीटी टेललाइट (Vcwtty Taillight) रात्रीच्या वेळी सुरक्षित प्रवासासाठी ही टेललाइट अत्यंत उपयुक्त असून ती टर्न इंडिकेटरप्रमाणे काम करते. हे डिव्हाइस इंडिकेटरचे चिन्ह जमिनीवर प्रोजेक्ट करते आणि वळताना आवाजही देते. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी ही लाइट अत्यंत चमकदारपणे काम करते.

3 / 7

क्रिप्टोनाइट कीपर ७१२ कॉम्बो लॉक (Kryptonite Keeper 712 Combo Lock) ई-सायकल सुरक्षेच्या बाबतीत क्रिप्टोनाइट हा विश्वासू ब्रँड मानला जातो. हे मेकॅनिकल कॉम्बिनेशन लॉक असल्याने चावी सोबत ठेवण्याची गरज भासत नाही. साखळीवर वॉटरप्रूफ अन् अँटी-रस्ट नायलॉन कव्हर दिलेले असून कट-प्रतिरोधक साखळीमुळे चोरीचा प्रयत्न सहज अपयशी ठरतो.

4 / 7

विटकॉप बाइक मिरर (Wittkop Bike Mirror) मागून येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी हे हँडलबार मिरर्स अत्यंत आवश्यक आहेत. समाविष्ट केलेल्या अ‍ॅलेन रेंचच्या मदतीने हे सहज फिट होतात आणि ३६०-डिग्री अ‍ॅडजस्टमेंट देतात. खडखडीत रस्त्यांवर किंवा जास्त वेगात असतानाही हे आरसे हलत नाहीत, ज्यामुळे लेन बदलताना मागील ट्रॅफिक स्पष्ट दिसते.

5 / 7

रेस्ट्रोस्पेक्ट अपोलो डिटॅचेबल बास्केट (Retrospec Apollo Detachable Bike Basket) दैनंदिन वस्तू किंवा सामान वाहून नेण्यासाठी ही एक बहुगुणी बास्केट आहे. यासाठी कोणत्याही टूल्सची गरज पडत नाही, फक्त हँडलबारवर ही बास्केट अडकवायची असते. दुकानात खरेदी करताना ही बास्केट सहज काढून सोबत नेता येते आणि खरेदीनंतर पुन्हा सायकलवर फिट करता येते.

6 / 7

व्हिकटोपर बाइक लाइट (Victoper Bike Light) रात्रीच्या वेळी रस्ता स्पष्ट दिसण्यासाठी आणि स्वतःचे स्थान इतरांना दर्शवण्यासाठी ही एलईडी लाइट उपयुक्त ठरते. या सेटमध्ये हेडलाइट आणि रेड टेललाइट सोबत चार्जर्स मिळतात. ही लाइट काढणे आणि बसवणे अत्यंत सोपे असल्याने सायकल पार्क करताना ती सोबत काढून सुरक्षित ठेवता येते.

7 / 7

अ‍ॅस्ट्रोएआय एल७ टायर इन्फ्लेटर (AstroAI L7 Tire Inflator) टायरमधील हवा कमी झाल्यास हा पोर्टेबल एअर कॉम्प्रेसर अत्यंत उपयुक्त ठरतो. यामध्ये हवी असलेली हवा सेट करता येते आणि तितकी हवा भरल्यावर हे डिव्हाइस आपोआप बंद होते. हे डिव्हाइस वजनाने हलके असून यात दिलेली इन-बिल्ट एलईडी लाइट रात्रीच्या वेळी टायर दुरुस्त करताना मदतीची ठरते.

Web Title: Top ebike accessories user reviews safety gadgets auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग सुरू! 2027 मध्ये भारतात होणार लाँच? पाहा काय आहेत डिटेल्स
1

रिव्हर RX02 इलेक्ट्रिक स्कूटरची टेस्टिंग सुरू! 2027 मध्ये भारतात होणार लाँच? पाहा काय आहेत डिटेल्स

MG Windsor EV Facelift  2027 मध्ये येणार? 61kWh बॅटरीमुळे रेंज वाढणार! अजून काय आहे यात खास
2

MG Windsor EV Facelift  2027 मध्ये येणार? 61kWh बॅटरीमुळे रेंज वाढणार! अजून काय आहे यात खास

हिरो मोटोकॉर्पला ₹27 कोटींच्या टॅक्स डिमांडमधून दिलासा; ITAT चा मोठा निर्णय! जाणून घ्या सविस्तरपणे
3

हिरो मोटोकॉर्पला ₹27 कोटींच्या टॅक्स डिमांडमधून दिलासा; ITAT चा मोठा निर्णय! जाणून घ्या सविस्तरपणे

महिंद्रा XEV 9e Sporteq Series लवकरच भारतात दाखल होणार; 70 kWh बॅटरीसह मिळणार नवे अपडेट्स!
4

महिंद्रा XEV 9e Sporteq Series लवकरच भारतात दाखल होणार; 70 kWh बॅटरीसह मिळणार नवे अपडेट्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.