Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota च्या ‘या’ कारचा भारतात डंका ! ओलांडला 3 लाख विक्रीचा ऐतिहासिक टप्पा

टोयोटाने भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. यातच आता कंपनीच्या दोन कार्सने भारतीय मार्केटमध्ये तीन लाख विक्रीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 27, 2025 | 06:15 AM
Toyota च्या 'या' कारचा भारतात डंका ! ओलांडला 3 लाख विक्रीचा ऐतिहासिक टप्पा

Toyota च्या 'या' कारचा भारतात डंका ! ओलांडला 3 लाख विक्रीचा ऐतिहासिक टप्पा

Follow Us
Close
Follow Us:

टोयोटाने भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. यातच आता कंपनीच्या दोन कार्सने भारतीय मार्केटमध्ये तीन लाख विक्रीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.

भारताच्या प्रीमियम एसयूव्ही मार्केटमध्ये आपली भक्कम ओळख निर्माण करत टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. टोयोटा फॉर्च्युनर आणि लेजेंडरच्या एकत्रित तीन लाख युनिट्सची विक्री पूर्ण झाली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी केवळ या दोन एसयूव्हींच्या लोकप्रियतेचे प्रतिबिंब नसून, टोयोटा ब्रँडवरील ग्राहकांचा विश्वास, टिकाऊपणा आणि परफॉर्मन्सबद्दलची बांधिलकीही अधोरेखित करते.

Audi चा ब्रँड अँबॅसिडर होत Neeraj Chopra कडून ‘ही’ करोडो किमतीची कार खरेदी

2009 मध्ये भारतीय बाजारात आलेली टोयोटा फॉर्च्युनर आजपर्यंत तिच्या पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी, अफाट ऑफ-रोड क्षमता आणि टिकाऊपणासाठी ओळखली जाते. 2.8 -लिटर डिझेल इंजिनमुळे ती 204 पीएस पॉवर आणि 500 एनएम टॉर्क निर्माण करते. अ‍ॅडव्हान्स 4×4 ड्राइव्ह आणि लॅडर-फ्रेम चेसिसच्या मदतीने ती अत्यंत खडतर रस्त्यांवरही उत्तमरीत्या धावते. या कारचे डिझाइन, हाय ग्राउंड क्लिअरन्स आणि एलईडी हेडलॅम्पसह ताकद दाखवणारा लूक यामुळे ती रस्त्यांवर विशेष लक्ष वेधून घेते.

2021 मध्ये बाजारात आलेली ‘लेजेंडर’ ही या यशस्वी प्रवासाचा पुढचा टप्पा ठरली. अर्बन आणि प्रीमियम अनुभवासाठी डिझाइन केलेली ही एसयूव्ही विशेष ड्युअल-टोन स्टाइलिंग, एलईडी टर्न इंडिकेटर, वायरलेस चार्जिंग आणि 11-स्पीकर जेबीएल ऑडिओ सिस्टमसह आली आहे. ती फॉर्च्युनरच्या तांत्रिक सामर्थ्यांना शहरी लक्झरीचा स्पर्श देते, जी प्रगत ग्राहकांना उद्देशून तयार करण्यात आली आहे.

या दोन्ही कार्सच्या विक्रीचे यशाचे गमक म्हणजे त्यांची अतुलनीय विश्वासार्हता, कमी मेंटेनन्स कॉस्ट, आणि हाय रिसेल व्हॅल्यू. टोयोटाच्या क्यूडीआर म्हणजेच Quality, Durability, and Reliability या मूलभूत तत्वांवर या कार्सची रचना केली आहे. त्यामुळेच फॉर्च्युनर आणि लेजेंडर ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय ठरतात.

ABS आणि Non ABS मध्ये नेमका फरक काय, कोणत्या टेक्नॉलॉजीमध्ये मिळते सर्वात जास्त सेफ्टी?

या विक्रमाबद्दल TKMचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा म्हणाले, “तीन लाख युनिट्स विक्रीचा टप्पा गाठणे ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. फॉर्च्युनर आणि लेजेंडरप्रमाणे विश्वासार्ह, ताकदवान आणि लक्झरी अनुभव देणाऱ्या एसयूव्हींसाठी भारतीय ग्राहकांनी दाखवलेला प्रेम आणि विश्वास आम्हाला अधिक प्रेरणा देतो.”

टोयोटाची टी केअर सर्व्हिस सिस्टीम – विक्रीपूर्व, विक्रीनंतर आणि पुनर्खरेदी सेवा – ग्राहकांचे संपूर्ण वाहन मालकी अनुभव सुलभ, सोपे आणि समाधानकारक बनवते.

या ऐतिहासिक यशासह टोयोटा फॉर्च्युनर आणि लेजेंडर भारतातील प्रीमियम एसयूव्ही क्षेत्रातील निर्विवाद अग्रणी म्हणून पुन्हा सिद्ध झाले आहेत. जिथे लोकांची मनं जिंकली जातात.

Web Title: Toyota fortuner and legender crossed 3 lakh sales

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • record sales

संबंधित बातम्या

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश
1

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक
2

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?
3

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ
4

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.