
फोटो सौजन्य: Gemini
पाकिस्तानचा ऑटो सेक्टर सध्या मोठ्या अडचणीतून जात आहे. पाकिस्तानात कार्सच्या किंमती इतक्या वेगाने वाढल्या आहेत की भारतातील खरेदीदारांनी त्या ऐकल्या तरी त्यांना धक्का बसेल. पाकिस्तानमध्ये कार महाग होण्यामागे प्रचंड करदर, स्थानिक उत्पादनाचा अभाव, परकीय चलनाची कमतरता, वाढती महागाई आणि कमकुवत सप्लाय चेन हे प्रमुख कारण मानले जातात. त्यामुळेच भारतात 5–6 लाख रुपयांत मिळणाऱ्या कार पाकिस्तानमध्ये तब्बल 30–40 लाख PKR मध्ये मिळतात.
लोकप्रिय WagonR भारतात जिथे केवळ 4.98 लाख रुपयांना उपलब्ध आहे, तिथे पाकिस्तानमध्ये या कारची किंमत तब्बल 32 लाख PKR आहे. दोन्ही देशांच्या ऑटो क्षेत्रातील तफावत यावरून स्पष्ट होते.
EVs चा भारतीय Auto Sector मध्ये दबदबा! ऑक्टोबर Electric Car च्या विक्रीत भरमसाट वाढ
भारतामध्ये किफायतशीर किंमत आणि विश्वासार्ह परफॉर्मन्ससाठी ओळखली जाणारी Honda City पाकिस्तानमध्ये मात्र खूप महाग आहे. तिथे अद्याप जुनी Gen 4 विकली जाते आणि याची किंमत 47.37 लाख PKR (सुमारे 14.75 लाख रुपये) आहे. भारतात या कारच्या नवीन जनरेशनचा टॉप मॉडेल 14.31 लाख रुपयांना मिळतो, म्हणजे पाकिस्तानमध्ये जुनी सिटी सुद्धा भारतापेक्षा अधिक महाग आहे.
भारतामध्ये Toyota Fortuner महागडी मानली जाते, पण पाकिस्तानमधील किंमत त्याहून अनेक पटींनी जास्त आहे. तिथे या SUV ची सुरुवातीची किंमत 1.49 कोटी PKR आहे, जी भारतीय रुपयांत सुमारे 46–47 लाख होते. आयात आणि करांमुळे वाहनांच्या किंमती किती वाढतात, याचे हे मोठे उदाहरण आहे.
भारतामध्ये Swift ही अत्यंत लोकप्रिय आणि किफायती हॅचबॅक असून तिची सुरुवातीची किंमत 5.37 लाख रुपये आहे. पण पाकिस्तानमध्ये तिच्या जुनी Gen 3 साठी तब्बल 44.60 लाख PKR (सुमारे 13.89 लाख रुपये) मोजावे लागतात. ही किंमत भारतातील अनेक कॉम्पॅक्ट SUVs पेक्षाही जास्त आहे.
भारतामध्ये Toyota Hilux ची किंमत 28.02 लाख रुपये आहे, तर पाकिस्तानमध्ये तिच्या Revo व्हर्जनची किंमत तब्बल 1.23 कोटी PKR (सुमारे 38 लाख रुपये) आहे. करांच्या दरांमुळे आणि आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे या गाडीची किंमत आणखी वाढते.
भारतामध्ये नुकतेच लागू केलेल्या GST 2.0 नंतर वाहनांवरील करदर 18% ते 40% या एकसमान श्रेणीत आले आहेत. त्यामुळे गाड्यांच्या किंमतींमध्ये ग्राहकांना थेट फायदा होत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे भारतात आजही कार्स तुलनेने स्वस्त मिळतात, तर पाकिस्तानमध्ये WagonR सारखी एंट्री-लेव्हल कारही 32 लाख PKR ला मिळते.