फोटो सौजन्य: Gemini
वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे ग्राहक आता इलेक्ट्रिक कारला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे, भारतात इलेक्ट्रिक कार्सची वाढती मागणी आता ऑटोमोबाईल उद्योगाचे नवे स्वरूप ठरताना दिसत आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये 18,000 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार्सची विक्री झाली. या आकड्यांवरून स्पष्ट होते की भारतीय ग्राहक पेट्रोल-डिझेलऐवजी इलेक्ट्रिक कारांना अधिक पसंती देत आहेत. फेस्टिव सीझनची मागणी, सुधारलेली EV तंत्रज्ञान, वाढती रेंज आणि कंपन्यांच्या नव्या लाँचमुळे EV विक्रीत मोठी वाढ दिसली. ऑक्टोबरमध्ये EV विक्रीत वार्षिक स्तरावर 57% तर महिन्यागणिक 18% वाढ नोंदवली गेली.
Kawasaki ने भारतात लाँच केली 1,099 cc इंजिनच्या 2 बाईक, किंमत 12 लाखांपेक्षाही जास्त
टाटा मोटर्सने ऑक्टोबर महिन्यातही EV विक्रीत आपला दबदबा कायम ठेवला. कंपनीने 7,239 इलेक्ट्रिक कारांची विक्री केली, ज्यात सप्टेंबरच्या तुलनेत 16% वाढ झाली. वार्षिक आधारावरही कंपनीने 10% वाढ नोंदवली. Tiago EV, Tigor EV, Punch EV, Nexon EV, Curvv EV आणि Harrier EV या मॉडेल्समुळे टाटा देशातील EV मार्केटमध्ये आघाडीवर आहे. विशेषतः Tiago EV आणि Punch EV यांनी बजेट सेगमेंटमध्ये मोठा प्रभाव टाकला आहे, तर Nexon EV प्रीमियम ग्राहकांची आवड कायम आहे.
JSW MG Motor दुसऱ्या क्रमांकावर राहिली. कंपनीने 4,549 EVs विकल्या, ज्यात वार्षिक आधारावर 63% वाढ दिसली. कंपनीची MG Windsor EV सर्वात वेगाने विकली जाणारी कार ठरत आहे. याशिवाय MG Comet EV, ZS EV, Cyberster आणि M9 या मॉडेल्सची मागणीही स्थिर आहे.
महिंद्राने या वर्षी EV मार्केटमध्ये जोरदार कमबॅक केले आहे. ऑक्टोबरमध्ये कंपनीने 3,911 इलेक्ट्रिक कारांची विक्री करत 309% वार्षिक वाढ नोंदवली. XEV 9e, BE.6 आणि अपडेटेड XUV400 या SUV मॉडेल्समुळे महिंद्राची EV लाइनअप वेगाने लोकप्रिय होत आहे.
किया इंडियाने ऑक्टोबरमध्ये 656 इलेक्ट्रिक कारांची विक्री केली आणि वार्षिक आधारावर तब्बल 1295% वाढ नोंदवली. Carens Clavis EV ही Kiaची सर्वाधिक विकली गेलेली EV ठरली. BYD ने 570 EVs विकत 43% वार्षिक वाढ साधली. कंपनीच्या Atto 3 आणि Seal मॉडेल्सची मागणी सातत्याने वाढत आहे.






