Toyota Kirloskar Motor च्या वाहनांना ग्राहकाचा कसा प्रतिसाद?
टोयोटा किर्लोस्कर मोटरने सप्टेंबर 2025 मध्ये एकूण 31,091 युनिट्सची विक्री करून आपल्या विक्रीत उल्लेखनीय वाढ साधली आहे. या आकडेवारीमध्ये 27,089 युनिट्स देशांतर्गत विक्री आणि 4,002 युनिट्स निर्यात बाजारपेठेत पाठवलेल्या आहेत.
गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर 2024 मध्ये कंपनीने 26,847 युनिट्स विकल्या होत्या. या तुलनेत या वर्षी विक्रीत 16 टक्क्यांची वाढ झाली आहे, ज्यामुळे टोयोटा ब्रँडसाठी भारतीय बाजारपेठेत वाढत्या ग्राहकविश्वासाचा प्रत्यय पुन्हा आला आहे.
केवळ मासिकच नव्हे, तर आर्थिक वर्ष 2025 -26 च्या पहिल्या सहामाहीतही टोयोटाची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2024 या कालावधीत कंपनीने 1,62,623 युनिट्स विकल्या होत्या, तर एप्रिल ते सप्टेंबर 2025 या कालावधीत विक्री वाढून 1,84,959 युनिट्स इतकी झाली आहे. म्हणजेच वार्षिक तुलनेत कंपनीने 14 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार
टीकेएमचे सेल्स, सर्विस आणि युज्ड कार बिझनेसचे उपाध्यक्ष वरिंदर वाधवा यांनी या यशाबद्दल बोलताना सांगितले की, “भारत सरकारने जीएसटी दरांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे आणि सणासुदीचा सिझन सुरू झाल्याने बाजारपेठेतील उत्साह सर्वोच्च पातळीवर आहे. टोयोटामध्ये आम्ही ग्राहकांना जीएसटीमधील संपूर्ण फायदे हस्तांतरित केले आहेत, ज्यामुळे आमच्या उत्पादनांवरील मागणी अधिक वाढली आहे. आम्हाला विश्वास आहे की सणासुदीच्या काळात आमची कामगिरी आणखी मजबूत होईल.”
ते पुढे म्हणाले, “सध्या आम्ही वेळेवर डिलिव्हरी देण्यावर अधिक भर देत आहोत, जेणेकरून ग्राहक त्यांच्या आवडत्या टोयोटा वाहनासह सणासुदीचा आनंद वेळेवर उपभोगू शकतील आणि हा सीझन अधिक खास बनवू शकतील.”
सप्टेंबर 2025 मध्ये टोयोटाने आपल्या लोकप्रिय Rumion MPV चे नवीन आणि अधिक सुरक्षित रूप सादर केले. सुधारित सेफ्टी फीचर्ससह सर्व व्हेरिएंट्समध्ये सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. तसेच कंपनीने ग्राहकांना जीएसटी कपातीचे संपूर्ण फायदे देत वाहनांच्या किमती कमी केल्या, ज्यामुळे ग्राहकवर्गाकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.
याशिवाय, टोयोटाने आपल्या ब्रँड ओळखीत आणखी भक्कमपणा आणण्यासाठी जपानमधील आंतरराष्ट्रीय परफॉर्मन्स ग्रुप ‘Drum Tao’ सोबत पार्टनरशिप जाहीर केली आहे.