Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Toyota Urban Cruiser Taisor चे अपडेटेड व्हर्जन सादर, आता अनुभवा अधिक सुरक्षित प्रवास

टोयोटा नेहमीच्या ग्राहकांच्या मागणीनुसार उत्तम कार डिझाइन करत असते, तसेच त्याला अपडेट सुद्धा करत असते. नुकतेच कंपनीने Toyota Urban Cruiser Taisor चे अपडेटेड व्हर्जन सादर केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 13, 2025 | 08:24 PM
फोटो सौजन्य: @ToyotaRajesh (X.com)

फोटो सौजन्य: @ToyotaRajesh (X.com)

Follow Us
Follow Us:

ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाशी बांधील राहून आणि सर्वोत्तम कार अनुभव देण्यावर लक्ष केंद्रित करत, टोयोटा किर्लोस्‍कर मोटर (टीकेएम)ने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही अर्बन क्रूझर टायसरमध्ये दोन महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केल्या आहेत. यामध्ये सर्व व्हेरिएंट्समध्ये आता प्रमाणित सहा एअरबॅग्जचा समावेश आणि निवडक व्हेरिएंट्समध्ये नवीन ‘ब्ल्युइश ब्लॅक’ एक्स्टिरिअर रंगाची भर घालण्यात आली आहे. किंमत ७.७७ लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

नवीन रंग, अधिक स्टाईल

टायसरच्या गतीशील आणि आकर्षक डिझाइनला आणखी उठाव देण्यासाठी टीकेएमने ‘ब्ल्युइश ब्लॅक’ रंग सादर केला आहे. हा शेड वाहनाच्या रस्त्यावरच्या उपस्थितीला अधिक लक्षवेधक बनवतो आणि ग्राहकांना स्पोर्टी लुकसह एक आकर्षक पर्याय देतो. हा बदल कॉम्पॅक्ट एसयूव्ही खरेदीदारांच्या वैयक्तिकरणाच्या वाढत्या मागणीचा विचार करून करण्यात आला आहे.

अरे ही खरंच बाईक आहे का? Ola कडून इलेक्ट्रिक बाईक Diamondhead चा टिझर प्रदर्शित

सर्व व्हेरिएंट्समध्ये सहा एअरबॅग्ज

सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठी सुधारणा करत, आता अर्बन क्रूझर टायसरच्या सर्व व्हेरिएंट्समध्ये सहा एअरबॅग्ज प्रमाणित म्हणून उपलब्ध आहेत. यात ड्युअल फ्रंट, दोन साइड आणि दोन कर्टन एअरबॅग्जचा समावेश असून विविध ड्रायव्हिंग परिस्थितींमध्ये प्रवाशांना सर्वांगीण संरक्षण मिळते. या अपडेटमुळे ई, एस, एस+, जी आणि व्ही अशा सर्व श्रेणींमध्ये सुरक्षिततेचा उच्च दर्जा सुनिश्चित झाला आहे.

इंजिन व परफॉर्मन्स

टायसरमध्ये दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत – १.२ लिटर के-सिरीज पेट्रोल इंजिन आणि १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन. हे मॉडेल जवळपास २२.७९ किमी/लीटरचा अपवादात्मक मायलेज देते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ५एमटी, ५एएमटी आणि ६एटी यांचा समावेश आहे, जे विविध ड्रायव्हिंग स्टाईलसाठी उपयुक्त ठरतात.

वाहन चालकांनो लक्ष द्या ! HSRP Number Plate साठी अखेरचे काही तास बाकी,नंतर भरावा लागेल 10,000 रुपयांचा दंड

आधुनिक डिझाइन आणि इंटीरिअर

बाहेरील डिझाइनमध्ये स्लिक एलईडी हेडलॅम्प्स, ट्विन एलईडी डीआरएल, क्रोम अॅक्सेंटसह सिग्नेचर ट्रॅपेझॉइडल ग्रिल देण्यात आली आहे. आतील बाजूस प्रीमियम ड्युअल-टोन केबिन, ६०:४० स्प्लिट रिअर सीट्स, रिअर एसी वेंट्स आणि वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅपल कारप्ले असलेले टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे.

सोयी व तंत्रज्ञान

टायसरमध्ये क्रूझ कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स (एटी व्हेरिएंटमध्ये), वायरलेस चार्जिंग, तसेच टोयोटा आय-कनेक्टसह स्मार्टवॉच व व्हॉइस असिस्टंट सुसंगतता आहे. यामुळे प्रत्येक प्रवास अधिक आरामदायी व कनेक्टेड होतो.

सेफ्टी फीचर्स

सहा एअरबॅग्जशिवाय, टायसरमध्ये व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल (VSC), हिल होल्ड असिस्ट, ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स आणि इतर प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

वॉरंटी आणि सर्व्हिस

अर्बन क्रूझर टायसर ३ वर्षे / १,००,००० किमी वॉरंटीसह येते, जी ५ वर्षे / २,२०,००० किमीपर्यंत वाढवता येते. तसेच टोयोटाची एक्सप्रेस मेंटेनन्स सर्विस आणि २४x७ रोडसाइड असिस्टन्स सुविधाही उपलब्ध आहे.

Web Title: Toyota urban cruiser taisor updated version with new color safety feature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 08:24 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • toyota

संबंधित बातम्या

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम
1

महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!
2

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!

Black-White च्या रंगांत हरवतेय का ऑटोमोबाईलची दुनिया? विविध रंगी गाड्या होतायत इतिहासजमा
3

Black-White च्या रंगांत हरवतेय का ऑटोमोबाईलची दुनिया? विविध रंगी गाड्या होतायत इतिहासजमा

या आहेत जगातल्या 10 सर्वात जुन्या इंजिनच्या कार : Top 10 Oldest Engine Cars In World
4

या आहेत जगातल्या 10 सर्वात जुन्या इंजिनच्या कार : Top 10 Oldest Engine Cars In World

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.