Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील RTO Border Check Post कायमस्वरूपी बंद होणार? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्रातील RTO Border Check Post कायमस्वरूपी बंद होणार अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. चला याबद्दल अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: May 11, 2025 | 03:25 PM
महाराष्ट्रातील RTO Border Check Post कायमस्वरूपी बंद होणार? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्रातील RTO Border Check Post कायमस्वरूपी बंद होणार? परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्टच सांगितले

Follow Us
Close
Follow Us:

केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार आणि GST सिस्टमच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व मोटार परिवहन सीमा चौक्‍या म्हणजेच RTO border check post कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा उद्देश आंतरराज्य वाहतूक सुरळीत करणे आणि व्यावसायिक वाहनांच्या हालचाली तील अडथळे दूर करणे हा आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री पुढे म्हणाले की सन 1966 मध्ये स्थापन झालेल्या या सीमा चौक्‍यांचा उद्देश वाहनांची हालचाल नियंत्रित करणे, परिवहन नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि रोड टॅक्स वसूल करणे असा होता. मात्र GST लागू झाल्यानंतर व डिजिटल अंमलबजावणीच्या उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे प्रत्यक्ष चौकशीसाठी स्थापन केलेल्या या सीमा चौकींची आवश्यकता आता उरलेली नाही.

फक्त 2 लाखांच्या डाउन पेमेंटमुळे दारात उभी राहील Tata Curvv, फक्त ‘एवढा’ असले EMI

या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील परिवहन विभागाला निर्देश दिले होते. तसेच मुख्य परिवहन आयुक्त कार्यालयाच्या भूमिपूजन प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या सीमा चौकी लवकरच बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्याबरोबरच राज्य ट्रान्सपोर्ट युनियन ने देखील वारंवार यासंदर्भात निवेदन देऊन सीमा चौक्या बंद करण्याबद्दल मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रशासकीय त्रुटी दूर करून सकारात्मक अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे. त्यांच्या मंजुरी नंतर राज्याच्या सीमेवरील चेकपोस्ट बंद करण्यात येतील.

504 कोटी रुपये नुकसानभरपाई अदा करणे आवश्यक

तत्पूर्वी महाराष्ट्रात मोटार परिवहन व सीमाशुल्क विभाग यांच्या एकत्रित तपासणी नाक्यांसाठी “इंटिग्रेटेड चेक पोस्ट” प्रकल्प राबवण्यात आला होता. त्यासाठी अदानी प्रा.लि. या संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. तसेच संबंधित सुविधांचे संचालन व देखरेख करण्यासाठी त्यांच्या सोबत करार केले गेले होते. परंतु, चेक पोस्ट बंद करण्याच्या निर्णयामुळे संबंधित संस्थेला नुकसान भरपाई म्हणून 504 कोटी रुपये अदा करणे आवश्यक आहे. या संदर्भातील प्रस्ताव परिवहन विभागाकडून मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यांची मंजुरी मिळताच सीमेवरील सर्व तपासण्याचे बंद करण्यात येतील. अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

आताच लाँच झालेल्या ‘या’ Electric Car ला दणादण मिळतेय बुकिंग, फक्त 24 तासात मिळवले हजारो ग्राहक

या संदर्भात परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीने या निर्णयाचे परिणाम व परिणामकारकता यांचा सखोल अभ्यास केला. या अहवालाच्या आधारे शासनाने हे निष्कर्ष काढले की, ऑनलाईन सिस्टम व इलेक्ट्रॉनिक देखरेखीद्वारे प्रत्यक्ष चौकशीची गरज प्रभावीपणे बदलता येऊ शकते. या संक्रमणामुळे कार्यक्षमतेत वाढ, विलंब कमी होणे आणि गैरप्रवृत्ती रोखण्यास मदत होईल. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

या निर्णयामुळे महाराष्ट्र 18 इतर राज्यांप्रमाणे आधुनिक, कागदविरहित व तंत्रज्ञानाधिष्ठित परिवहन देखरेखीच्या प्रणालीचा अवलंब करणाऱ्या राज्यांमध्ये समाविष्ट होतो आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय वाहतूकदारांना लाभदायक ठरेल, रस्ता सुरक्षेमध्ये सुधारणा करेल आणि केंद्र शासनाच्या ‘Ease of Doing Business’ या दृष्टीकोनाशी सुसंगत असेल.

Web Title: Transport minister pratap sarnaik rto border check post in maharashtra will be closed permanently

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • RTO Office

संबंधित बातम्या

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश
1

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक
2

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?
3

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ
4

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.