फोटो सौजन्य: Social Media
भारतीय बाजारात अनेक उत्तम कार ऑफर केल्या जातात. यातही प्रत्येक ग्राहकाची आवड ही वेगळी असल्या कारणाने ऑटो कंपन्या कार्स अनेक व्हेरियंटमध्ये लाँच करत असतात. सध्या मार्केटमध्ये टाटा मोटर्स दमदार कार ऑफर करत आहे, ज्यांना ग्राहकांचा देखील उत्तम प्रतिसाद मिळतोय. काही महिन्यांपूर्वी Coupe SUV सेगमेंटमध्ये कंपनीने Tata Curvv ऑफर केली होती. ज्यावर ग्राहकांनी अक्षरशः प्रेमाचा पाऊस पाडला होता.
कंपनीकडून डिझेलमध्ये Tata Curvv Smart Diesel हा बेस व्हेरियंट ऑफर केला जातो. जर तुम्हीही या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल. तर हा लेख तुमच्यासाठीच लिहिला आहे. आज आपण अजनून घेऊयात की फक्त 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करून या कारसाठी तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल, त्याबद्दल जाणून घेऊयात. पण त्याआधी या कारची किंमत जाणून घेऊयात.
आतापासून Kia ची ‘ही’ कार मार्केटमध्ये दिसणार नाही ! कंपनीने सांगितले कारण
टाटा कर्व्हचा डिझेल व्हेरियंट भारतीय बाजारात 11.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे. जर ही कार राजधानी दिल्लीत खरेदी केली तर तुम्हाला अंदाजे 1.18 लाख रुपयांचा रोड टॅक्स आणि 51 हजार रुपयांचा विमा भरावा लागेल. याशिवाय, टीसीएस शुल्क म्हणून 11499 रुपये द्यावे लागतील. त्यानंतर टाटा कर्व्ह डिझेलच्या बेस व्हेरियंटची ऑन-रोड किंमत सुमारे 13.30 लाख रुपये होते.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरियंट स्मार्ट डिझेल खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवर कारला फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 11.30 लाख रुपयांचे फायनान्स करावे लागेल. जर बँक तुम्हाला 9% व्याजदराने सात वर्षांसाठी 11.30 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील सात वर्षांसाठी दरमहा 18188 रुपये ईएमआय भरावा लागेल.
जर तुम्ही बँकेकडून 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 11.30 लाख रुपयांचे कार लोन घेतले तर तुम्हाला सात वर्षांसाठी दरमहा 18188 रुपये ईएमआय भरावा लागेल. अशा परिस्थितीत, सात वर्षांत तुम्हाला या टाटा एसयूव्हीसाठी सुमारे 3.97 लाख रुपये व्याज द्यावे लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 17.27 लाख रुपये होईल.
टाटा कर्व्ह ही भारतीय बाजारात कूप एसयूव्ही म्हणून लाँच करण्यात आली आहे. जरी ही एसयूव्ही Citroen Basalt शी स्पर्धा करत असली तरी, त्याशिवाय ही कार Maruti Grand Vitara, Toyota Urban Cruiser Hyryder, Mahindra XUV 700, MG Hector सारख्या एसयूव्हींकडूनही आव्हान मिळते.