फोटो सौजन्य: @MGMotorIn (X.com)
भारतीय मार्केटमध्ये आता इलेक्ट्रिक कार्सची एक वेगळीच डिमांड पाहायला मिळत आहे. त्यात वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींना कंटाळून अनेक ग्राहक इलेक्ट्रिक कार्सच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर देशातील सरकार देखील EV च्या विक्रीला प्रोत्साहन देत आहे. यामुळेच अनेक ऑटो कंपन्या ज्या आधी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार उत्पादित करीत होत्या, त्याच आज EVs च्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे.
भारतीय मार्केटमध्ये अनेक लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहेत. MG Windsor EV ही त्यातीलच एक. या कारला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता कंपनीने MG Windsor EV Pro ही नवीन कार लाँच केली आहे. या कारने लाँच झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत 8000 बुकिंग मिळवून बाजारात चांगली सुरुवात केली आहे. कंपनीने विंडसर प्रोची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 17.49 लाख रुपये ठेवली आहे.
‘या’ कारने ग्राहकांना अक्षरशः वेड लावलंय ! डिमांड एवढी की फक्त 5 दिवसात विकला गेला पहिला स्लॉट
जेएसडब्ल्यू एमजी इंडियाचे विक्री प्रमुख राकेश सेन म्हणाले की, प्रचंड प्रतिसाद हा कंपनीच्या ईव्ही तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्णतेचा आणि ग्राहकांच्या विश्वासाचा पुरावा आहे. ही कार भारतातील वेगाने वाढणाऱ्या 4 व्हीलर इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात कंपनीच्या मजबूत पावलाचे प्रतीक आहे.
एमजी विंडसर प्रो हा एकमेव Essence Pro व्हेरियंट उपलब्ध आहे, जो मोठ्या 52.9kWh क्षमतेच्या प्रिझमॅटिक सेल बॅटरीसह येतो. कंपनीचा दावा आहे की ही ईव्ही 449 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देण्यास सक्षम आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर 134bhp ची पॉवर आणि 200Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. विंडसर प्रोला खास बनवणारी गोष्ट म्हणजे त्याची लेव्हल-2 एडीएएस Advanced Driver Assistance System), ज्यामध्ये स्मार्ट सेफ्टी फीचर्स आहेत. याशिवाय, त्यात व्हेईकल-टू-लोड (V2L) आणि व्हेईकल-टू-व्हेईकल (V2V) चार्जिंग टेक्नॉलजी देखील आहे, ज्याद्वारे ते इतर वाहने किंवा उपकरणे देखील चार्ज करू शकते.
Honda कडून भारतात पहिल्यांदाच E-क्लच टेक्नॉलजीने सुसज्ज असणारी बाईक लाँच, मात्र किंमत खिसा कापणारी
एमजी विंडसर प्रो चे एक्सटिरिअर अतिशय स्टायलिश आहे, ज्यामध्ये नवीन डायमंड-कट अलॉय व्हील डिझाइन आहे आणि ते तीन आकर्षक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे – सेलेडॉन ब्लू, ग्लेझ रेड आणि ऑरोरा सिल्व्हर.
कारच्या इंटिरिअरबद्दल बोलायचे झाले तर, केबिन ड्युअल-टोन आयव्हरी आणि ब्लॅक अपहोल्स्ट्रीने डिझाइन केले आहे, जे त्याला प्रीमियम लूक देते. ही कार 15.6-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 8.8-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, पॅनोरॅमिक ग्लास रूफ आणि 9-स्पीकर इन्फिनिटी साउंड सिस्टम सारख्या हाय-टेक फीचर्सने सुसज्ज आहे.