
350cc इंजिनमध्ये खास ट्युनिंग
बोनव्हिल T40 मध्ये 350cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन देण्यात आले असून ते 29hp पॉवर आणि 31.2Nm टॉर्क जनरेट करते. लो आणि मिड-रेंजमध्ये दमदार परफॉर्मन्स मिळावा यासाठी इंजिनची खास ट्युनिंग करण्यात आली आहे. यात नवीन सिलिंडर हेड, कॅमशाफ्ट, लहान थ्रॉटल बॉडी आणि खास पे-शूटर एक्झॉस्ट देण्यात आला आहे. 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत तुलनेने टॉल गिअरिंग मिळते.
रेट्रो लूकसोबत आधुनिक फीचर्स
बोनव्हिल T40 मध्ये 4-इंच कलर TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 5 रायडिंग मोड्स, क्रूझ कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि लीन-सेंसिटिव्ह ABS मिळते. ‘हेरिटेज’ डिस्प्ले मोडमुळे रायडरला जुन्या काळातील रेट्रो लूकचा अनुभवही घेता येतो. स्मार्टफोन कनेक्ट केल्यानंतर ट्रायम्फच्या नेव्हिगेशन अॅपद्वारे टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनची सुविधाही मिळते.
195kg वजन आणि 790mm सीट हाइट
बोनव्हिल T40 चे वजन 195kg असून यात 14.5 लिटरचा फ्युल टँक आहे. सीट हाइट 790mm असून अॅक्सेसरी लो सीटच्या मदतीने ती 770mm पर्यंत कमी करता येते. ग्राउंड कॅपसिटी 165mm आहे. बाइकला पुढे 43mm टेलिस्कोपिक फोर्क आणि मागे ट्विन शॉक अॅब्जॉर्बर्स मिळतात. स्पोक व्हील्ससोबत ट्यूब टायर्स देण्यात आले आहेत.
पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
T4 ची किंमत कमी, पण फीचर्सही कमी
ज्यांना T40 ची किंमत जास्त वाटते, त्यांच्यासाठी बोनव्हिल T4 हा ऑप्शन आहे. तिची किंमत ₹2.55 लाख असून यात कलर LCD डिस्प्ले, नेव्हिगेशन, रायडिंग मोड्स आणि ड्युअल-चॅनल ABS मिळते. पण क्रूझ कंट्रोल आणि IMU देण्यात आलेले नाही. T4 ची डिलिव्हरी जानेवारी 2027 पासून सुरू होईल. बुकिंग दोन्ही मॉडेल्ससाठी सुरू आहे.