Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Triumph: ट्रायम्फचे मोटो २ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी नवे आणि अधिक पावरफुल इंजिन! पाहा काय असेल या इंजिनची खासियत

ट्रायम्फने २०२७ च्या मोटो२ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी नवीन रेस इंजिनचे अनावरण केले आहे. हे नवीन इंजिन ६% अधिक पीक पॉवर देईल आणि त्याचे वजन २ किलोने कमी असून चेसिसमध्ये देखील बदल करावे लागतील.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 09, 2026 | 02:09 PM
Triumph: ट्रायम्फचे मोटो २ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी नवे आणि अधिक पावरफुल इंजिन! पाहा काय असेल या इंजिनची खासियत
Follow Us
Follow Us:
  • ट्रायम्फने २०२७ च्या मोटो२ चॅम्पियनशिपसाठी नवीन रेस इंजिन सादर केले असून ते ६ टक्के अधिक पीक पॉवर देणार आहे.
  • सिलिंडर, कम्बशन चेंबर आणि एअर इनटेक सिस्टीममध्ये व्यापक बदल केल्यामुळे या नवीन इंजिनचे एकूण वजन २ किलोने कमी झाले आहे.
  • नवीन इंजिनच्या एअर इनटेक आणि माउंटिंग पॉईंट्समधील बदलावांमुळे मोटो२ चेसिस उत्पादकांना पूर्णपणे नवीन चेसिस तयार करावी लागणार आहे.

ट्रायम्फ मोटरसायकल्सने २०२७ च्या मोसमापासून मोटो२ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वापरण्यात येणाऱ्या आपल्या नवीन रेस इंजिनचे अनावरण केले आहे. हे नवीन इंजिन सध्याच्या इंजिनपेक्षा सुमारे ६ टक्के जास्त पीक पॉवर देईल, असा दावा कंपनीने केला आहे. यासोबतच इंजिनचे अंतर्गत भाग, कुलिंग आणि एअर इनटेक सिस्टीममध्ये व्यापक बदल करण्यात आले आहेत.

ट्रायम्फने सिलिंडरमध्ये जाणाऱ्या हवेचा प्रवाह वाढवण्यावर भर दिला आहे. यासाठी पूर्णपणे नवीन डिझाइन केलेले सिलिंडर हेड, लो-इन्र्शिया व्हॉल्व्हट्रेन, हायर-फ्लो पोर्ट्स आणि सुधारित कम्बशन चेंबर देण्यात आले आहे. या बदलांमुळे कॉम्प्रेशन रेशिओ वाढवण्यास मदत झाली असून, सर्व रेव्ह रेंजमध्ये टॉर्क वाढवणे शक्य झाले आहे.

वाढलेली पॉवर आणि टॉर्क पेलण्यासाठी क्रँककेस आणि इतर अंतर्गत भाग पुन्हा डिझाइन केले गेले आहेत. परफॉर्मन्स वाढलेला असतानाही या इंजिनचे एकूण वजन २ किलोने कमी करण्यात आल्याचे ट्रायम्फने स्पष्ट केले आहे. इंजिनची अचूक तांत्रिक वैशिष्ट्ये सध्या तरी गुप्त ठेवण्यात आली असून, कंपनी ती नंतर जाहीर करेल.

हॅचबॅक गाड्यांना मस्क्युलर लुक देण्यासाठी या आहे टॉप 5 बेस्ट आयडिया! पाहा कोणती आहे तुमच्यासाठी करेक्ट

चेसिसमध्ये करावे लागणार बदल

या इंजिन अपग्रेडमुळे ‘मोटो२’ च्या चेसिस उत्पादकांना २०२७ साठी पूर्णपणे नवीन चेसिस विकसित करावी लागणार आहे. विशेषतः एअर इनटेकची जागा आणि इंजिन माउंटिंग पॉईंट्समध्ये मोठे बदल करावे लागतील. यासाठी लागणारी टेक्नोलॉजीकल माहिती गेल्या १२ महिन्यांपासून चेसिस उत्पादकांना पुरवली जात असल्याचे ट्रायम्फने सांगितले आहे.

हे नवीन इंजिन लवकरच मोटो२ च्या टीम्सना उपलब्ध करून दिले जाईल, ज्याची खाजगी चाचणी आधीच सुरू झाली आहे. २०२७ मध्ये चॅम्पियनशिपमध्ये ऑफीशल प्रवेश करण्यापूर्वी या वर्षाच्या शेवटी ट्रॅकवर याचे पदार्पण अपेक्षित आहे.

Tata Nexon Camo: सणासुदीच्या काळात टाटाचा धमाका; नवीन नेक्सॉन कॅमो झाली लाँच!

मोटो२ आणि ट्रायम्फचे रिलेशन

ट्रायम्फ २०१९ पासून मोटो२ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी एकमेव इंजिन पुरवठादार आहे. सध्या सर्व मोटो२ गाड्यांमध्ये ७६५cc चे, ३-सिलिंडर इंजिन वापरले जाते, जे ट्रायम्फच्या स्ट्रीट ट्रिपल आरएस या रोड बाईकवर आधारित आहे.

एकमेव इंजिन पुरवठादार असण्यासोबतच ट्रायम्फने गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर डेटा गोळा केला आहे. ट्रायम्फकडे एकूण १९,२६,१३२ किमीचा रेसिंग डेटा आणि रायडर्स तसेच टीम्सचा विस्तृत फीडबॅक जमा झाला आहे. ट्रायम्फ आणि मोटोजीपीने आपली ही मोटो२ मधील पार्टनरशिप आता २०२९ पर्यंत वाढवली आहे.

Web Title: Triumph reveals new moto2 race engine 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:09 PM

Topics:  

  • automobile
  • Triumph
  • Triumph Bikes

संबंधित बातम्या

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ
1

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
2

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
3

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
4

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.