Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय ऑटो इंजिनअरिंगचा जगात डंका! टेस्ला आणि BYD ला मागे टाकत टाटा मोटर्स बनली जगातील सर्वाधिक कार्यक्षम EV उत्पादक कंपनी!

ICCT च्या 'ग्लोबल ऑटोमेकर रेटिंग्स २०२५' अहवालानुसार, टाटा मोटर्सने अव्वल स्थान मिळवत टेस्ला आणि BYD ला ऊर्जा कार्यक्षमतेत मागे टाकले आहे. टाटाच्या ईव्हेंची सरासरी ऊर्जा खपत १०६ Wh/km नोंदवली गेली असून, भारतीय कंपन्यांच्या या यशामुळे ग्राहकांचा वाहन चालवण्याचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 09, 2026 | 02:58 PM
भारतीय ऑटो इंजिनअरिंगचा जगात डंका! टेस्ला आणि BYD ला मागे टाकत टाटा मोटर्स बनली जगातील सर्वाधिक कार्यक्षम EV उत्पादक कंपनी!
Follow Us
Follow Us:
  • आयसीसीटी अहवालानुसार टाटा मोटर्स १०६ Wh/km ऊर्जा वापरासह टेस्लाला मागे टाकून जगात सर्वात ऊर्जा-कार्यक्षम ठरली आहे.
  • महिंद्रा ऑटोमोटिव्हने ११३ Wh/km च्या उत्तम कामगिरीसह या जागतिक ऊर्जा-कार्यक्षमता यादीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. 
  • कमी वीज वापरामुळे वाहनांची कार्यक्षमता वाढून ग्राहकांचा दैनंदिन वाहन चालवण्याचा आणि चार्जिंगचा खर्च कमी होणार आहे. 

‘इंटरनॅशनल कौन्सिल ऑन क्लीन ट्रान्सपोर्टेशन’ च्या ‘ग्लोबल ऑटोमेकर रेटिंग्स २०२५’ अहवालानुसार, टाटा मोटर्स आणि महिंद्रा या भारतीय कंपन्या जगातील सर्वात जास्त एनर्जी एफीशीयंट ऊर्जा-कार्यक्षम इलेक्ट्रिक वाहन उत्पादक म्हणून समोर आल्या आहेत. या शर्यतीत त्यांनी टेस्ला आणि BYD सारख्या जागतिक टायकून कंपन्यांनाही मागे टाकले आहे.

या रेटिंगमध्ये जगभरातील २२ मोठ्या वाहन उत्पादक कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. या अहवालात कंपन्यांचा इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रातील बदल, ईव्हेंची विक्री, उत्पादनातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न आणि बॅटरी इलेक्ट्रिक व्हेईकलची कार्यक्षमता या घटकांचा अभ्यास करण्यात आला.

Triumph: ट्रायम्फचे मोटो २ वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी नवे आणि अधिक पावरफुल इंजिन! पाहा काय असेल या इंजिनची खासियत

ऊर्जा कार्यक्षमतेत भारतीय कंपन्यांचा दबदबा

ऊर्जा कार्यक्षमतेच्या तुलनेत टाटा मोटर्सने जागतिक स्तरावर प्रथम स्थान पटकावले आहे. ICCT च्या मते, टाटा मोटर्सचे प्रति किलोमीटर विजेचा वापर दर्शवणारे प्रमाण अवघे १०६ Wh/km (वॉट-अवर प्रति किलोमीटर) नोंदवले गेले, जे सर्व उत्पादकांमध्ये सर्वोत्कृष्ट आहे. या यादीत ११३ Wh/km सह महिंद्रा ऑटोमोटिव्ह दुसऱ्या स्थानावर आहे.

ग्लोबल सरासरी १३१ Wh/km असताना, भारतीय कंपन्यांनी टेस्ला आणि BYD च्या तुलनेत खूपच कमी वीज वापर नोंदवला आहे. प्रति किलोमीटर कमी वीज वापराचा अर्थ असा की, ही वाहने कमी विजेत जास्त अंतर कापतात, ज्यामुळे वाहनाची कार्यक्षमता वाढते आणि ग्राहकांचा रनिंग कॉस्ट कमी होतो. टाटा मोटर्सने BYD च्या १२० Wh/km च्या तुलनेत १०६ Wh/km अशी उत्तम कामगिरी करून आघाडी घेतली.

हॅचबॅक गाड्यांना मस्क्युलर लुक देण्यासाठी या आहे टॉप 5 बेस्ट आयडिया! पाहा कोणती आहे तुमच्यासाठी करेक्ट

टाटा मोटर्सचा इव्ही क्षेत्रातील वाढता विस्तार

२०२४ मध्ये टाटाने नवीन ईव्ही मॉडेल्स सादर करून आपला पोर्टफोलिओ वाढवला आहे. यासोबतच टाटा आणि तिची उपकंपनी ‘जॅग्वार लँड रोव्हर’ने मुख्य बाजारांमध्ये बॅटरी रिसायकलिंगवर भर द्यायला सुरुवात केली आहे.

मलेशियाच्या बाजारात प्रवेश

टाटा मोटर्स लवकरच मलेशियाच्या ऑटोमोबाईल बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत असून, तिथल्या प्रमुख ऑटो ग्रुपसोबत मजबूत नेटवर्क तयार करण्यावर काम करत आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती २०२६ च्या चौथ्या तिमाहीपूर्वी जाहीर केली जाईल असे सांगितले जात आहे.

Web Title: Triumph reveals new moto2 race engine 2027 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicle
  • Mahindra And Mahindra
  • tata motors

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.