
TVS मोटर कंपनीने आपल्या लोकप्रिय ‘iQube’ इलेक्ट्रिक स्कुटरचा भारतातील १० लाख ग्राहकांचा टप्पा पार केल्याच्या प्रीत्यर्थ TVS iQube MillionR हे खास स्पेशल एडिशन लाँच केले आहे. कर्नाटक येथे लाँच करण्यात आलेल्या या ६५२ किलोमीटर टप्पा गाठणाऱ्या स्कुटरची एक्स-शोरूम किंमत ₹१,४०,१३८ ठेवण्यात आली आहे. ही स्कुटर iQube च्या ३.५kWh व्हेरियंटवर आधारित आहे.
स्टायलिश आणि आकर्षक डिझाईन
या स्पेशल एडिशनला नेहमीच्या स्कुटरपेक्षा वेगळे बनवण्यासाठी अनेक कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत
१४५ किमी रेंज आणि ३.५kWh बॅटरी
TVS iQube MillionR मधील ३.५kWh बॅटरी पॅक १४५ किमी ची क्लेम केलेली रेंज देतो. TVS iQube मालिकेची मूळ एक्स-शोरूम किंमत ₹१,११,३१० पासून सुरू होते, तर बॅटरी-ॲज-अ-सर्व्हिस प्लॅन ₹५९,९९९ पासून उपलब्ध आहेत.
सुपरकारचा लुक आता स्कुटरमध्ये! ‘Mansory’ ने मॉडिफाय केली Yamaha TMAX 560; पाहा काय आहे खास
१० लाख ग्राहकांचा उत्सव
यापूर्वी TVS ने २०१६ मध्ये ‘Jupiter’ च्या १० लाख विक्रीचा टप्पा ओलांडल्यावर ‘MillionR’ नाव वापरले होते. आता iQube साठी हे नाव पुन्हा आणून कंपनीने ई-व्ही क्षेत्रातील आपले यश साजरे केले आहे. आकर्षक लूक आणि उत्तम रेंजमुळे ही स्कुटर शहरी भागातील ग्राहकांसाठी एक चांगला पर्याय ठरेल.