फोटो सौजन्य: Social Media
सध्या देशभरात नवरात्रीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. आता कुठे खऱ्या अर्थाने सणासुदीचा काळ चालू होणार आहे. याच कळत अनेक जण नवीन बाईक किंवा स्कुटर घेताना दिसतात. जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याच्या विचारात आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी टीव्हीएसने आपली एका इलेक्ट्रिक स्कुटर बंपर डिस्काउंट देण्याची घोषणा केली आहे.
सध्या भारतीय नागरिक ईव्हीकडे एक चांगला पर्याय म्हणून पाहत आहेत, विशेषत: स्कूटरकडे. TVS हा एक सुप्रसिद्ध दुचाकी ब्रँड आहे ज्याने आपल्या तंत्रज्ञान आणि उत्तर दुचाकीनीमुळे ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. त्याची TVS iQube ही एक विश्वसनीय इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी सर्वात पसंतीची फॅमिली EV मानली जाते. आतापर्यंत 350000 हून अधिक समाधानी ग्राहक या स्कूटरशी जोडले गेले आहेत. जर तुम्हाला ही उत्तम EV स्कूटर खरेदी करायची असेल, तर ही योग्य संधी आहे, कारण त्यावर आता 30,000* रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर मिळत आहे. ही स्कुटर 5 व्हेरियंट, 10 कलर आणि विविध रेंज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
सणासुदीचा काळ ही खरेदीसाठी योग्य वेळ असते हे आपण सर्वेच जाणतो. यावेळी, विविध उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट उपलब्ध असते, ज्याचा लोक पुरेपूर लाभ घेताना दिसतात. TVS iQube आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे. ती खरेदी करण्याची हीच योग्य वेळ आहे. परंतु लक्षात ठेवा, ही ऑफर ऑक्टोबर महिन्यापुरती मर्यादित आहे.
या इलेक्ट्रिक स्कुटरची सुरुवातीची किंमत रु 89,999* आहे. याशिवाय, तुम्हाला रु. 25,000* पर्यंतचा झटपट कॅशबॅक देखील मिळेल. तसेच तुम्ही ही इलेक्ट्रिक स्कूटर Rs 7,999* च्या कमी डाउन पेमेंटसह आणि Rs 2,399* च्या EMI सह खरेदी करू शकता.
हे देखील वाचा: Ola Electric Boss Sale: Ola कडून बॉस सेलची घोषणा, फक्त 49999 रुपयात मिळणार S1 स्कुटर
TVS iQube मध्ये स्मार्ट आणि नाविन्यपूर्ण फीचर्स प्रदान करण्यात आले आहेत, जी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत मदत करतात आणि उत्तम राइडिंग अनुभव देतात. इतर काही कंपनीज या फीचर्ससाठी अधिक शुल्क आकारतात. फीचर्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.