कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन्स लिमिटेड या भारतातील प्रमुख इलेक्ट्रिक दुचाकी (ई२डब्ल्यू) व इलेक्ट्रिक तीनचाकी (ई३डब्ल्यू) उत्पादक कंपनीला लीड अॅसिड आणि लिथियम बॅटरी व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध सफर स्मार्ट पॅसेंजर वेईकलच्या लिमिटेड एडिशनची घोषणा करण्यात आली.
सफर स्मार्ट एडिशनची वेैशिष्ट्ये
या सफर स्मार्ट एडिशनमध्ये प्रवासी आणि सामानासाठी चांगल्याप्रमाणात एैसपैस जागा आहे. सफरमध्ये शक्तिशाली टॉप रूफसह खास उपलब्ध करण्यात आलेले कॅरियर आहे, ज्यामुळे प्रवाशांना कॅरियरवर सामान स्टोअर करण्यासोबत आरामदायी प्रवास करता येईल. तसेच या वेईकलमध्ये नवीन म्युझिक सिस्टम, फ्लोअर मॅट्स आणि स्टायलिश व्हील कॅप्स आहेत,
सणासुदीच्या काळामध्ये कायनेटिक ग्रीनकडून स्पेशल डिल्स ही ग्राहकांकरिता सादर करण्यात आल्या आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून डिलरशिप्समध्ये या ऑफर्सचा लाभ घेता येऊ शकतो.
कमी डाऊन पेमेंट आणि ईएमआयही किफायतशीर
कायनेटिक ग्रीनने लक्षवेधक फायनान्सिंग पॅकेज देण्यासाठी चोलामंडलम फायनान्स आणि रेव्हफिन फायनान्स या दोन प्रमुख फायनान्सर्ससोबत सहयोग केला आहे, ज्यामुळे ग्राहकांना ई ३डब्ल्यू खरेदी करणे अधिक सोईस्कर झाले आहे. उदाहरणार्थ, कायनेटिक ग्रीन पॅसेंजर सफर स्मार्ट लीड अॅसिड ई३डब्ल्यूसाठी आता २९,००० रूपये इतक्या कमी डाऊन पेमेंटची गरज आहे, तसेच ईएमआय ८,२०० रूपयांपासून सुरू होतो. तसेच, कायनेटिक ग्रीन लिथियम बॅटरी व्हर्जन ३२,००० रूपयांच्या डाऊन पेमेंटसह खरेदी करता येऊ शकते आणि ईएमआय ८,५०० रूपयांपासून सुरू होतो.
याव्यतिरिक्त, ग्राहक त्यांची वैयक्तिक पसंती व वापराच्या पद्धतींनुसार लीड अॅसिड ई३डब्ल्यू साठी एक वर्षाची वॉरंटी व १८ महिन्यांची कर्ज मुदत किंवा लिथियम मॉडेलसाठी तीन वर्षांची वॉरंटी व तीन वर्षांची कर्ज मुदत यामधून निवड करू शकतात. हे उपक्रम ई३डब्ल्यूचे ग्राहक बनण्यासाठी महत्वाचे असणार आहेत.
तीनचाकींसाठी आकर्षक फायनान्सिंग आणि बॅटऱ्यांची निवड करण्याचा पर्याय
या उपक्रमांबाबत मत व्यक्त करत कायनेटिक ग्रीनच्या थ्री व्हिलर बिझनेसचे अध्यक्ष श्री. देबाशिष मित्र म्हणाले, ”ही उत्साहवर्धक संधी आहे, ज्यामागे आमचा कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक तीनचाकींसाठी आकर्षक फायनान्सिंग आणि बॅटऱ्यांची निवड करण्याचा पर्याय देत इलेक्ट्रिक वेईकल्स अधिक उपलब्ध होण्योजोग्या करण्याचा मनसुबा आहे. हे पर्याय व्यक्तींना सहजपणे शाश्वत गतीशीलतेचा अवलंब करण्यास सक्षम करतील. इलेक्ट्रिक वेईकल्स अधिक उपलब्ध होण्याजोग्या व वैशिष्ट्यांनी संपन्न करत आम्ही अधिकाधिक व्यक्तींना शाश्वत परिवहन सोल्यूशन्सचा अवलंब करण्याचे आणि भारतातील लास्ट माइल कनेक्टीव्हीटीचे डिकार्बनाइज करण्याप्रती योगदान देण्याचे आवाहन करत आहोत.”
विकास धोरणाचा भाग म्हणून कंपनीचे तीन-चाकी विभागाचे डिलरशिप नेटवर्क २०२४ मधील २०० वरून २०२५ अखेरपर्यंत ४०० डिलर्सपर्यंत विस्तारित करत मोठे टप्पे गाठण्याचा मनसुबा आहे.कायनेटिक ग्रीनचे आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी तीन-चाकी विभागात २५० ते ३०० कोटी रूपयांचा महसूल संपादित करण्याचे देखील लक्ष्य आहे, ज्यासाठी कंपनीची बाजारपेठ उपस्थिती दृढ करत आहे आणि व्यवसाय विकासाला चालना देत आहे.