फोटो सौजन्य: Social Media
सध्या देशभरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. खरंतर गणेशोत्सव सुरु झाल्यानंतर सणासुदीचा काळ सुरु चालू झाला असतो. या सणासुदीच्या काळात अनेक ब्रॅण्ड्स आपल्या उत्पादनावर अधिकची सूट देत असतात. नुकतेच देशातील प्रमुख इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनीने म्हणजेच ओलाने एका मोठ्या सेलची घोषणा केली आहे.
सणासुदीचा काळ सुरू होताच कंपनीने बॉस नावाची ऑफर लाँच केली आहे. या ऑफरतून कोणता फायदा होऊ शकतो? कंपनी कोणत्या किंमतीत स्कूटर ऑफर करत आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
Ola ने BoSS नावाची ऑफर लाँच केली आहे. ही सेल Biggest OLA Season Sale म्हणून सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये कंपनी आपली स्कूटर अतिशय कमी किंमतीत देत आहे. यासोबतच इतरही अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत.
हे देखील वाचा: Volkswagen ने एकाच वेळी केल्या दोन कार्स लाँच, जाणून घ्या त्यांची किंमत आणि फीचर्स
कंपनीने OLA S1 फक्त 49999 रुपयांच्या किंमतीत ऑफर केला आहे. ही ऑफर OLA S1X च्या 2 kWh व्हेरियंटवर दिली जाईल. याशिवाय कंपनीने हे देखील स्पष्ट केले आहे की ही ऑफर मर्यादित स्टॉकवरच दिली जाणार आहे.
49999 रुपयांची स्कूटर ऑफर करण्याव्यतिरिक्त, कंपनी बॉस सेल अंतर्गत S1 2kWh वर 25 हजार रुपये आणि S1 पोर्टफोलिओमधील इतर स्कूटरच्या खरेदीवर 15 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. एक्सचेंज बोनस म्हणून रु. 5,000, रु. 6,000 किमतीची 140 हून अधिक Move OS फीचर्स, रु. 7,000 ची आठ वर्षांची बॅटरी वॉरंटी, रु. 3,000 पर्यंतचे हायपर चार्जिंग क्रेडिट देखील दिले जात आहेत.
ओलाने रेफरल प्रोग्रामही सुरू केला आहे. ज्याअंतर्गत प्रत्येक रेफरलवर 3000 रुपयांची सूट दिली जाईल आणि रेफरीला दोन हजार रुपयांची सूटही मिळू शकेल. टॉप 100 रेफरर्सना 1111111 रुपयांपर्यंतची बक्षिसे दिली जातील. याशिवाय ॲक्सेसरीजवर कंपनीकडून अतिरिक्त ऑफर्सही दिल्या जात आहेत.
S1x ही ओलाची सर्वात कमी किंमतीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कुटरच्या सर्वात स्वस्त व्हेरियंटमध्ये 2kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. पूर्ण चार्ज केल्यानंतर, ही स्कुटर इको मोडवर 84 किलोमीटर आणि सामान्य मोडवर 71 किलोमीटरपर्यंत चालवता येते.
या स्कुटरमध्ये 4.3-इंचाचा एलसीडी इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एलईडी लाइट्स, इको, नॉर्मल आणि स्पोर्ट्स ड्रायव्हिंग मोड, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, 34 लीटर अंडरसीट स्टोरेज, पुढील आणि मागील बाजूस ड्रम ब्रेकसह 12-इंच व्हील्स आहेत.