
फोटो सौजन्य: Pinterest
भारतीय ग्राहकांकडून टीव्हीएस दुचाकींना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या महिन्यात, नोव्हेंबर 2025 मध्ये विक्रीच्या बाबतीत, टीव्हीएस ज्युपिटरने जवळपास 1,25,000 युनिट्स विकून अव्वल स्थान पटकावले आहे. मात्र, मागणीच्या बाबतीत टीव्हीएस रोनिनने इतर सर्व मॉडेल्सना मागे टाकले. गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये TVS Ronin ला एकूण 7,653 नवीन खरेदीदार मिळाले. मात्र, वर्षानुवर्षे आधारावर, टीव्हीएस रोनिनच्या विक्रीत 139.16 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की कंपनीच्या इतर कोणत्याही मॉडेलमध्ये वर्षानुवर्षे विक्रीत इतकी वाढ झाली नाही. चला टीव्हीएस रोनिनचे फीचर्स, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल अधिक जाणून घेऊया.
‘हा’ एक फायनान्स प्लॅन आणि थेट शोरुममधून Honda City तुमच्या घरी! जाणून घ्या Down Payment आणि EMI
तरुणांमध्ये टीव्हीएस मोटर कंपनीची स्टायलिश रोनिन झपाट्याने लोकप्रिय होत आहे. या बाईकचे डिझाइन रेट्रो आणि आधुनिक लूकचे परिपूर्ण कॉम्बिनेशन आहे. एलईडी डीआरएलसह त्याचा गोलाकार हेडलॅम्प, रुंद फ्युएल टॅंक आणि आकर्षक बॉडी ग्राफिक्स या बाईकला प्रीमियम फील देतात. बाईकचे अलॉय व्हील्स, जाड टायर्स आणि अपमार्केट फिनिश तिला बाजारात उपलब्ध असलेल्या इतर बाईकपेक्षा वेगळी ओळख देते.
फीचर्सच्या बाबतीत TVS Ronin ही बाईक खूपच आकर्षक आहे. यात फुल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल देण्यात आला असून, त्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि SMS अलर्टसारख्या सुविधा मिळतात. याशिवाय गियर-शिफ्ट इंडिकेटर, साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ, ड्युअल-चॅनल ABS आणि Glide Through Technology (GTT) यांसारखे आधुनिक फीचर्सही देण्यात आले आहेत. हे सर्व फीचर्स दैनंदिन वापरासोबतच लॉंग राईडसाठीही या बाईकला एक उत्तम पर्याय बनवतात.
दरवाढी करण्यात आता Triumph ची देखील उडी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढवू शकते Bikes ची किंमत
पॉवरट्रेनबाबत सांगायचे झाले तर या बाईकमध्ये 225.9cc सिंगल-सिलेंडर, एअर-ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन सुमारे 20 bhp इतकी कमाल पॉवर आणि 19.93 Nm पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला 5-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. भारतीय बाजारात TVS Ronin ची एक्स-शोरूम किंमत सुमारे 1.35 लाख ते 1.73 लाख रुपयांदरम्यान आहे. या किमतीत ही बाईक Royal Enfield Hunter 350 आणि Honda CB350 सारख्या बाईक्सना थेट टक्कर देते.