फोटो सौजन्य: Pinterest
होंडा सिटी ही मिड साइझ सेडान कार म्हणून ऑफर केली जाते. ही कार अनेक व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला 2 लाखांचे डाउन पेमेंट भरल्यानंतर बेस व्हेरिएंट SV खरेदी करायचे असेल, तर तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल? त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Honda City SV ची एक्स-शोरूम किंमत 11.95 लाख रुपये आहे. जर तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला आरटीओसाठी अंदाजे 1.29 लाख आणि इंश्युरन्ससाठी अंदाजे 43000 रुपये द्यावे लागतील. याव्यतिरिक्त, तुम्हाला 11,953 रुपयांचा टीसीएस शुल्क भरावा लागेल. यामुळे होंडा सिटी एसव्हीची ऑन-रोड किंमत अंदाजे 13.85 लाख रुपये होईल.
10 वेळा किक मारली आणि सेल्फ स्टार्टवर सुद्धा बाईक चालू होईना! ‘या’ सोप्या टिप्स वापरून पाहाच
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट SV मध्ये खरेदी करत असाल, तर बँककडून एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. अशा परिस्थितीत 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर उर्वरित रक्कम सुमारे 11.85 लाख रुपये तुम्हाला बँकेतून कर्जाच्या स्वरूपात घ्यावे लागतील. बँकेकडून जर 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी हे कर्ज मंजूर झाले, तर तुम्हाला पुढील 7 वर्षे दरमहा सुमारे 19,273 रुपयांचा EMI भरावा लागेल.
शोरुमचा मालक हसत हसत देईल Maruti Suzuki Baleno CNG ची चावी, जाणून घ्या Down Payment आणि EMI
9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 11.85 लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास, तुम्ही एकूण सात वर्षांत दरमहा 19,273 रुपयांचा EMI भराल. या कालावधीत तुम्हाला सुमारे 4.33 लाख रुपये फक्त व्याज द्यावा लागेल. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज एकत्र धरले तर Honda City SV ची एकूण किंमत अंदाजे 18.18 लाख रुपये इतकी होईल.






