फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची बाईक खरेदी करणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुखद क्षण असतो. मात्र, बाईक खरेदी केल्यानंतर तिला मेंटेन ठेवणे सुद्धा तितकेच महत्वाचे असते. असे न केल्या नवीन बाईक काही वर्षातच जुन्या बाईकसारखा परफॉर्मन्स देईल. बाईक उत्तमरीत्या चालण्यासाठी त्यातील अनेक पार्ट्स नीट काम करणे महत्वाचे आहे.
बाईकच्या मेंटेनन्सकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्या इंजिनचेही मोठे नुकसान होऊ शकते. बऱ्याचदा लोक इंजिन ऑइल न बदलता किंवा न तपासता बाईक चालवतात. हीच बाब लक्षात घेत आज आपण इंजिन ऑइल कधी बदलणे चांगले आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.
Vinfast Limo Green इलेक्ट्रिक MPV भारतात येणार? सिंगल चार्जवर मिळेल 450 किमीची रेंज
इंजिन हा कोणत्याही बाईकचा सर्वात महत्वाचा भाग असतो आणि त्या इंजिनसाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इंजिन ऑइल. बऱ्याचदा लोक इंजिन ऑइल बदलण्यात बाबत निष्काळजीपणा दाखवतात. ज्यामुळे त्यांना नंतर मोठे नुकसान सहन करावे लागते.
प्रत्येक दुचाकी उत्पादक कंपनी बाईकसोबत मॅन्युअल बुक किंवा ई-मॅन्युअल बुक देतो. बाईक मॅन्युअलमध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती दिली असते. तसेच कोणत्या बाईकमध्ये कोणत्या प्रकारचे इंजिन ऑइल वापरावे याची माहिती देखील असते. यासोबतच इंजिन ऑइल कधी बदलावे याबद्दल ही माहिती दिली जाते. हे मॅन्युअल बुक वाचून तुम्हाला इंजिन ऑइल कधी बदलणे योग्य ठरेल याची माहिती मिळू शकते.
जर बाईक चालवताना इंजिन नेहमीपेक्षा जास्त आवाज करू लागले तर अशा परिस्थितीत इंजिन ऑइल बदलणे खूप महत्वाचे होते. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा बाईकमध्ये नवीन इंजिन ऑइल टाकले जाते तेव्हा इंजिनचा आवाज लक्षणीयरीत्या कमी होतो, परंतु जेव्हा जेव्हा ऑइल खराब होते तेव्हा इंजिनमधून येणारा आवाज वाढू लागतो.
Tata Safari, Innova ला डच्चू देत ‘या’ 7 सीटर कारने जुलै 2025 गाजवला, ताबडतोड झाली विक्री
जर तुमची बाईक चालवताना जास्त वेगाने जास्त गरम होऊ लागली तर इंजिन ऑइल खराब होण्याची शक्यता असते. यासोबतच, इंजिनमधील ऑइलची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली असण्याचा धोका देखील असतो. जर असे झाले तर इंजिनला नुकसान होण्याचा धोका वाढतो. म्हणून, जर अशी चिन्हे आढळ्यास इंजिन ऑइल तपासले पाहिजे आणि बदलले पाहिजे.