Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले संकेत ! देशात लवकरच वाहने इथेनॉल मिश्रित डिझेलवर चालणार

देशात इथेनॉलचा वापर डिझेलमध्ये करण्यासाठी संशोधन केले जात आहे. लवकरच इथेनॉल मिश्रित डिझेलचा देशात वाहनांकरिता वापर केला जाणार असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.

  • By नारायण परब
Updated On: Oct 19, 2024 | 07:28 PM
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले संकेत ! देशात लवकरच वाहने इथेनॉल मिश्रित डिझेलवर चालणार
Follow Us
Close
Follow Us:

जगभरामध्ये  पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचे नवनवीन पर्याय विकसित केले जात आहेत. इव्ही कार हळूहळू लोकांपर्यंत पोहचत आहे.  इथेनॉल मिश्रित पेट्रोल हाही एक चांगला पर्याय आहे. ज्यामुळे पेट्रोलचा वापर कमी करता येऊ शकतो. भारतामध्ये पेट्रोल मिश्रित इथेनॉलचे वापर आधीच सुरु झाले आहे. आता सरकारकडून पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याची टक्केवारी वाढवण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. सरकारने ऑक्टोबर 2025 पूर्वी E20 ( पेट्रोलमध्ये 20 टक्के मिश्रण) चे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने सरकार आक्रमकपणे पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील  इथेनॉल-मिश्रित डिझेलचे भविष्य आणि त्यावर सुरु असलेल्या संशोधनावर भाष्य केले आहे.

हे देखील वाचा-फक्त पुरस्कार नाही तर ‘या’ आलिशान कार्सवर कोरले आहे Gautam Gambhir चे नाव

नुकत्याच झालेल्या 12 व्या CII  ( Confederation of Indian Industry ) या बायोएनर्जी समिटमध्ये मंत्री नितीन गडकरी यांनी घोषित केले की देशात डिझेलमध्ये 15 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे संशोधन प्रगतीपथावर आहे. याचा अर्थ असा की, देशात लवकरच  डिझेलवर आधारित असलेली वाहने इथेनॉल-मिश्रित डिझेलवर चालणार आहेत. यामुळे केवळ इंधिनाची किंमत कमी होणार नाही तर  कार खरेदीदारांना या डिझेल वाहनाची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. आताच्या काळात पेट्रोल आणि डिझेलवरील कारच्या उत्पादनाबाबात, भारतामधील प्रमुख कार उत्पादकांचे लक्ष्य हे पेट्रोलवर आधारित कार उत्पादनाकडे जास्त आहे. मात्र डिझेलमधील या संशोधनामुळे  कार उत्पादक डिझेल वाहनांच्या निर्मितीवरही भर देऊ शकतात.

जर पेट्रोल आणि डिझेलमध्ये इथेनॉलचा वापर केला गेला तर  जीवाश्म इंधनावर मोठ्या प्रमाणात असणारे देशाचे अवलंबित्व कमी होणार आहे. महत्वाचे म्हणजे इथेनॉल हे देशामध्ये तयार करण्यात येते. नितीन गडकरी यांनी  वाहन निर्मात्यांना फ्लेक्स-इंधन इंजिन विकसित करण्यास सांगितले आहे, जे इथेनॉल इकोसिस्टम तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. सरकारकडून  सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू,  आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये इथेनॉल पंप उभारण्यात येत आहेत.

हे देखील वाचा- ‘या’ टायर्सचा वापर केल्यास बाईकच्या मायलेजमध्ये होईल जबरदस्त वाढ ! जाणून घ्या टायर्सचे फायदे

सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून सीएनजीलाही प्रोत्साहन दिले जात आहे. सरकार बायोमासद्वारे सीएनजी निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. परिवहन मंत्रालयाकडून इथेनॉल मिश्रित डिझेलच्या उपलब्धतेबद्दल लवकरच अधिक माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Union minister nitin gadkari gave an indication vehicles in the country will soon run on diesel mixed with ethanol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2024 | 07:23 PM

Topics:  

  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Nitin Gadkari on Voter List : अखेर नितीन गडकरींनीही केलं मान्य; महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी; कॉंग्रेस नेत्यांकडून VIDEO शेअर
1

Nitin Gadkari on Voter List : अखेर नितीन गडकरींनीही केलं मान्य; महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी; कॉंग्रेस नेत्यांकडून VIDEO शेअर

वाहन चालकांसाठीआनंदवार्ता! आता केवळ 15 रुपयांत पास करता येणार टोल प्लाझा; नेमकं कसं ते एकदा वाचाच
2

वाहन चालकांसाठीआनंदवार्ता! आता केवळ 15 रुपयांत पास करता येणार टोल प्लाझा; नेमकं कसं ते एकदा वाचाच

Nitin Gadkari Threat: नितीन गडकरींच्या घराला बॉम्बस्फोटाची धमकी; तपास सुरू
3

Nitin Gadkari Threat: नितीन गडकरींच्या घराला बॉम्बस्फोटाची धमकी; तपास सुरू

नितीन गडकरींना ‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार प्रदान; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ते कोणत्याही प्रसंगाला…”
4

नितीन गडकरींना ‘लोकमान्य टिळक’ पुरस्कार प्रदान; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “ते कोणत्याही प्रसंगाला…”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.