फोटो सौजन्य- iStock
बाईकच्या मायलेजसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. त्यापैकी टायर हा घटक ही महत्वाचा ठरतो. यातील स्टॉक टायर्स ज्यास फॅक्टरी फिटेड टायर्स असेही म्हटले जाते. विशेष म्हणजे हे टायर्स बाइकच्या डिझाइन आणि कामगिरीनुसार बनविण्यात येतात. स्टॉक टायर हे हलके असतात आणि कमी रोलिंग रेझिस्टन्स देतात, त्यामुळे इंजिनावरील भार कमी होतो आणि बाईकचे मायलेज सुधारते.
दुसरीकडे, आकाराने जाड असलेले टायर्सचा रस्त्याशी असणारा कॉन्टेक्ट एरिया जास्त असतो. ज्यामुळे बाईकची पकड आणि स्थिरता वाढत असली तरीही बाईकच्या इंजिनवर जास्त भार येतो आणि बाईकचे मायलेज कमी होते. कारण रस्त्यावर टायरचा जितका जास्त कॉन्टेक्ट तितका इंधनाचा वापर जास्त असते. जाड टायर हे स्टायलिश आणि अधिक आकर्षक असू शकतात मात्र मायलेज कमी करतात आणि तसेच यामुळे इंजिनाचा कर्कश आवाजही होतो.
स्टॉक टायर बसविण्याचे फायदे
उत्तम मायलेज
स्टॉक टायर्सचे डिझायनच हे कमी रोलिंग रेझिस्टन्स देण्यासाठी तयार करण्यात आले असते. परिणामी सांगितल्याप्रमाणे बाईकच्या इंजिनवर कमी ताण येतो त्यामुळेच इंधनाचा वापरही कमी होतो आणि मायलेजमध्ये वाढ होते.
सुरक्षितता
बाईकची रचना आणि तिचे वजन यांचा विचार करुनच निर्मात्याद्वारे स्टॉक टायर्स निवडले जातात त्यामुळे हे टायर्स सुरक्षित असतात. कोणत्याही ऋतुमध्ये हे टायर चांगली कामगिरी करतात.
बाईकची उत्तम हाताळणी आणि नियंत्रण
स्टॉक टायर्सची रचना ही बाईकचा समतोल आणि हाताळणी या घटकांना लक्षात घेऊन करण्यात येते ज्यामुळे बाईक चालवताना उत्तम स्थिरता आणि नियंत्रणही मिळते. महत्वाचे म्हणजे हे टायर बाईक वळणावरुन चालवताना आणि बाईक ब्रेकने थांबवतानाही उत्तम ठरतात.
टायर्सचा दीर्घकालीन टिकाऊपणा
स्टॉक टायर्सची निर्मिती ही टिकाऊ सामग्रीपासून केली जाते. ज्यामुळे हे टायर्स दीर्घकाळ टिकतात. त्यामुळ बाईकसाठी वारंवार टायर बदलण्याची आवश्यकता नसते.
कमी देखभाल खर्च
सांगितल्याप्रमाणे स्टॉक टायर्स हे इंजिन आणि इतर यांत्रिक घटकांवर कमी भार देतात त्यामुळे या घटकांच्या देखभालीसाठी कमी खर्च लागतो.
आरामदायी राईड
स्टॉक टायर्सची रचना ही वाहनचालकाचासाठी आरामदायी राईड व्हावी अशास्वरुपातच केलेली असते. हे टायर असलेली बाईक ही रस्त्यावरील अनियमितता आणि चढ उतार उत्तम पद्धतीने पार करते.