फक्त पुरस्कार नाही तर 'या' आलिशान कार्सवर कोरले आहे Gautam Gambhir चे नाव
गौतम गंभीर म्हंटलं तर अनेक क्रिकेटप्रेमींना आठवते ते ती 2011 ची फायनल. या मॅचमध्ये त्याने 97 धाव काढून भारताच्या विजयात मोलाचे योगदान दिले. सध्या गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. अन्य क्रिकेट स्टार्ससारखेच ते देखील आपल्या आलिशान कार्समधून प्रवास करत असतात. चला आज आपण जाणून घेऊया, गौतम गंभीर यांच्या कार कलेक्शनमध्ये कोणकोणत्या कार्स समाविष्ट आहे.
GLS 350d ही जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी मर्सिडीज-बेंझने भारतीय बाजारपेठेत SUV सेगमेंटमध्ये ऑफर केली आहे. ही दमदार SUV गौतम गंभीरच्या कलेक्शनमध्ये समाविष्ट आहे. ते अनेकदा या एसयूव्हीमध्ये प्रवास करताना दिसतात. तीन-लिटर सहा-सिलेंडर टर्बो डिझेल इंजिनसह, या SUV ला 286 हॉर्स पॉवर आणि 600 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. यामध्ये कंपनीने 4मॅटिक तंत्रज्ञान दिले आहे.
हे देखील वाचा: दिवाळीत जुनी कार विकायला काढताय? ‘ही’ 5 कामं करून घ्या, मिळेल उत्तम रिसेल व्हॅल्यू
मर्सिडीजसोबतच गौतम गंभीरकडे लक्झरी सेडान कार म्हणून BMW ची 530d देखील आहे. या कारमध्ये तीन लिटर क्षमतेचे सहा सिलिंडर डिझेल इंजिन आहे, ज्याने 620 न्यूटन मीटर टॉर्कसह 261 हॉर्स पॉवर प्रदान करते.
मर्सिडीज SUV आणि BMW sedans सोबत, Audi ची Q5 SUV ही गौतम गंभीरच्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट असलेली एक पॉवरफुल SUV आहे. यात दोन लिटर क्षमतेचे इंजिन आहे जे 370 न्यूटन मीटर टॉर्कसह 249 हॉर्स पॉवर देते.
लक्झरी कारसोबतच गौतम गंभीरकडे जपानी ऑटोमेकर टोयोटाची कोरोला सेडान कार देखील आहे. मात्र, कंपनीने याचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत आणणे बंद केले आहे. ही कार तिच्या त्याच्या उत्कृष्ट इंजिन आणि फीचर्समुळे ओळखली जायची. कंपनीने या कारमध्ये 1.8 लीटर क्षमतेचे इंजिन दिले आहे.
देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी मारुतीने ऑफर केलेली SX4 सेडान कार देखील गौतम गंभीरच्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट आहे. मात्र टोयोटा कोरोलाप्रमाणे या कारची सुद्धा विक्रीही बंद करण्यात आली आहे.