फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या जातात. यात सर्वात जास्त मागणी ही एसयूव्ही विभागातील कार्सना असते. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या दमदार परफॉर्मन्स देणाऱ्या एसयूव्ही ऑफर करत आहे. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील कंपन्या ऑफर करत आहे.
भारतात दरमहा लाखो वाहनांची विक्री होत असते. यामध्ये मोठ्या संख्येने एसयूव्ही सेगमेंटमधील वाहनांचा समावेश आहे. विक्री वाढवण्यासाठी तसेच लोकांना नवीन पर्याय देण्यासाठी, कंपन्या लवकरच Mid Size SUV सेगमेंटमध्ये नवीन कार लाँच करणार आहेत. चला जाणून घेऊयात, पुढील काही महिन्यांत कोणत्या नवीन एसयूव्ही लाँच केल्या जाऊ शकतात.
मुंबईत नवीन इलेक्ट्रिक कार Volvo EX30 सादर, सप्टेंबर 2025 च्या अखेरीस होणार लाँच
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्राकडून लवकरच आपली प्रीमियम एसयूव्ही XUV700 चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच करण्यात येऊ शकते. लाँचपूर्वी ही एसयूव्ही अनेकदा टेस्टिंगदरम्यान दिसून आली असून, मिळालेल्या माहितीनुसार तिच्या एक्सटिरिअर डिझाइनमध्ये मोठे बदल करण्यात येऊ शकतात.
मारुतीने 3 सप्टेंबर रोजी मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये व्हिक्टोरिस सादर केली आहे. ही एसयूव्ही पुढील काही महिन्यांत अधिकृतपणे बाजारात आणली जाईल. या एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत.
टाटा मध्यम आकाराच्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये सिएरा लाँच करण्याची तयारी करत आहे. निर्माता डिसेंबरपर्यंत ही एसयूव्ही लाँच करू शकते. लाँच होण्यापूर्वी, त्याची जवळपास-उत्पादन आवृत्ती ऑटो एक्सपोमध्ये देखील प्रदर्शित करण्यात आली आहे.
रेनॉल्टतर्फे लवकरच नवीन डस्टर भारतात लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, पुढील काही महिन्यांत ही कार अनधिकृतरित्या लाँच केली जाईल. मात्र, सध्या याच्या लाँचची नेमकी तारीख स्पष्ट झालेली नाही. तरीही अशी अपेक्षा आहे की, 2026 च्या सुरुवातीला ही कार भारतीय बाजारपेठेत दाखल होईल.
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! GST कपातीमुळे पेट्रोल-डिझेल वाहने स्वस्त होणार; TVS चे मोठे विधान
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निसानकडूनही लवकरच नवीन एसयूव्ही भारतीय बाजारात लाँच केली जाऊ शकते. मात्र, कोणती एसयूव्ही भारतात आणली जाणार आहे, याबाबत कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. ही कार देखील रेनॉल्ट डस्टरसारख्याच नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केली जाण्याची शक्यता असून, तिला 2026 मध्ये लाँच करण्याची तयारी सुरू आहे.