Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

April 2026 मध्ये ‘या’ 5 नवीन कार मार्केट गाजवण्याचा तयारीत! जाणून घ्या एकापेक्षा एक दमदार मॉडेल्स

जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर मग एकापेक्षा एक मॉडेल्स पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल 2026 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 30, 2026 | 05:00 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • एप्रिल 2026 मध्ये नवनवीन कार लाँच होणार
  • 9 एप्रिलला Volkswagen Taigun Facelift लाँच होणार
  • जाणून घ्या नवीन कार्सची संपूर्ण यादी
एप्रिल 2026 हा महिना ऑटो बाजारासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो. या महिन्यात अनेक नवीन वाहनांचे लाँचिंग, किमतींची घोषणा आणि नवीन मॉडेल्सची ओळख करून दिली जाण्याची शक्यता आहे. काही वाहने यापूर्वीच प्रदर्शित करण्यात आली असली, तरी त्यांच्या किमतींविषयीचे डिटेल्स एप्रिलमध्ये जाहीर केले जातील. या कालावधीत, विविध सेगमेंटमधील अनेक प्रमुख वाहने बाजारात एंट्री मारतील अपेक्षा आहे.

Volkswagen Taigun Facelift

नवीन Volkswagen Taigun भारतात 9 एप्रिल रोजी लाँच होणार आहे. या लेटेस्ट मॉडेलमध्ये वाहनाचे एक्सटिरिअर सौंदर्य आणि त्यातील फीचर्स या दोन्ही बाबतीत सुधारणा पाहायला मिळतील. यामध्ये 1.0-लिटर पेट्रोल इंजिनसोबत आता नवीन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स जोडला जाईल, अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, कारचा इंटिरिअर आणि एकूणच डिझाइनमध्येही काही सूक्ष्म बदल केले जातील, असे मानले जात आहे.

गाडी चालवताना ‘ही’ 5 कामं अजिबात करू नका! अन्यथा पोलीस मामा स्वतःच करतील तुमचं Driving License सस्पेंड

MG Majestor

MG Majestor ही SUV फेब्रुवारी 2026 मध्ये लाँच झाली असून, ती प्रत्यक्षात MG Gloster चे अपडेटेड व्हर्जन आहे. या कारचा फ्रंट लूक आधीपेक्षा अधिक दमदार करण्यात आला आहे. याशिवाय, नवीन अलॉय व्हील्स आणि अधिक फीचर्ससह प्रीमियम केबिन देण्यात आला आहे. या SUV ची बुकिंग आधीच सुरू झाली असून, ती 4 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. कंपनी मे 2026 पासून तिची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

Mercedes-Benz CLA

Mercedes-Benz CLA ही कार Mercedes-Benz एप्रिलमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक सेडान असून, CLA 200 आणि CLA 250+ या दोन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध होईल. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एका चार्जमध्ये तब्बल 792 किमीपर्यंत धावू शकते. फीचर्सच्या बाबतीत, 14-इंच टचस्क्रीन, ग्लास रूफ, 101-लिटरचा फ्रंट ट्रंक आणि व्हेंटिलेशनची सुविधा दिली आहे. तसेच, पुढील सीट्समध्ये हीटिंग आणि मसाज फंक्शनही देण्यात आले आहे.

Toyota Urban Cruiser Ebella

Toyota Urban Cruiser Ebella या इलेक्ट्रिक कारची किंमत एप्रिलमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. Toyota कडून सादर करण्यात आलेली ही कार Maruti Suzuki च्या इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. यात 40kWh आणि 61kWh असे दोन बॅटरी पर्याय देण्यात आले आहेत. मोठ्या बॅटरीसह ही कार एका चार्जमध्ये सुमारे 543 किमीपर्यंत रेंज देऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे.

Nissan Tekton

Nissan Tekton ही SUV एप्रिलमध्ये Nissan जागतिक स्तरावर सादर करू शकते. ही गाडी प्रत्यक्षात नवीन Renault Duster वर आधारित असली, तरी तिचा डिझाइन आणि इंटीरियर पूर्णपणे वेगळा असणार आहे. समोर आलेल्या डिझाइनमध्ये कनेक्टेड DRL लाईट्स, मागील बाजूस फुल-विड्थ टेल लाईट आणि स्टायलिश अलॉय व्हील्स पाहायला मिळतात.

Web Title: Upcoming cars in april 2026 volkswagen taigun facelift

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • MG

संबंधित बातम्या

गाडी चालवताना ‘ही’ 5 कामं अजिबात करू नका! अन्यथा पोलीस मामा स्वतःच करतील तुमचं Driving License सस्पेंड
1

गाडी चालवताना ‘ही’ 5 कामं अजिबात करू नका! अन्यथा पोलीस मामा स्वतःच करतील तुमचं Driving License सस्पेंड

Mahindra BE6 खरेदी करण्याचे स्वप्न होईल साकार! EMI 25,000 पेक्षा कमी; जाणून घ्या डाउन पेमेंटचं गणित
2

Mahindra BE6 खरेदी करण्याचे स्वप्न होईल साकार! EMI 25,000 पेक्षा कमी; जाणून घ्या डाउन पेमेंटचं गणित

इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी! PM E-DRIVE बाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय
3

इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी! PM E-DRIVE बाबत सरकारने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Maruti Swift Vs Tata Punch: एक हॅचबॅक तर दुसरी एसयूव्ही; मात्र किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती कार बेस्ट?
4

Maruti Swift Vs Tata Punch: एक हॅचबॅक तर दुसरी एसयूव्ही; मात्र किंमत, फीचर्स आणि इंजिनच्या बाबतीत कोणती कार बेस्ट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.