फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या अनेक वर्षांपासून उत्तम कार्स ऑफर करत आहे. यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे स्कोडा. स्कोडा कंपनीच्या कार्सकडे एक लक्झरी कार म्हणून देखील पाहिले जाते. आत कंपनी यंदाच्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये आपल्या काही कार्स लाँच करणार आहे.
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ येत्या १७ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजित केला जाणार आहे. यामध्ये अनेक वाहन उत्पादक सहभागी होणार आहेत. यात स्कोडाचे देखील नाव आहे. शॉक्ड आता 2025 च्या ऑटो एक्स्पोमध्ये त्यांच्या आगामी कार्स सादर करणार आहे. हे लक्षात घेऊनच, आज आपण ऑटो एक्स्पो २०२५ मध्ये स्कोडाच्या कोणत्या कार सादर करणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.
स्कोडा येत्या इंडिया मोबिलिटी एक्स्पोमध्ये भारतात नवीन ऑक्टाव्हिया आरएस सादर करू शकते. ही कार शेवटची २०२३ मध्ये विकली गेली होते, परंतु बीएस६ फेज-२ नियमांमुळे भारतात ही कार बंद करण्यात आले आहे. ऑटोमेकर ऑटो एक्स्पोमध्ये सादर केल्यानंतर ही कार भारतात देखील लाँच केले जाऊ शकते. यात २-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे, जे २६५ पीएस पॉवर आणि ३७० एनएम टॉर्क जनरेट करते.
Toyota Innova Hycross च्या वेटिंग पिरियडमुळे कंटाळले आहात? मग ‘या’ 5 कार्सचा विचार नक्की करा
ऑटो एक्स्पोमध्ये नवीन जनरेशनची स्कोडा सुपर्ब देखील सादर केली जाऊ शकते. या वर्षाच्या अखेरीस ही कार भारतातही लाँच केली जाऊ शकते. नवीन जनरेशन स्कोडा सुपर्ब उत्तम डिझाइनसह तसेच आलिशान इंटीरियरसह येते. त्यात अनेक इंजिन पर्याय पाहता येतील. इंडिया-स्पेक सुपर्बमध्ये पूर्वीप्रमाणेच १९० पीएस पॉवर निर्माण करणारे २-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन असल्याचे म्हटले जाते.
इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये नवीन स्कोडा कोडियाक देखील सादर केली जाईल. भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान ती अनेक वेळा दिसली आहे. यामध्ये १२.९-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरॅमिक सनरूफ आणि हवेशीर फ्रंट-रो सीट्स देखील दिसू शकतात. नवीन कोडियाकमध्ये २-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन असण्याची अपेक्षा आहे, जी ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडली जाऊ शकते.
अलिकडेच स्कोडा एन्याक आणि एन्याक कूप जागतिक स्तरावर सादर करण्यात आल्या आहेत. हे लक्षात घेता, ऑटो एक्स्पोमध्ये हेच मॉडेल सादर केले जाऊ शकते अशी अपेक्षा आहे. नवीन एन्याकच्या एक्सटिरिअर आणि इंटिरिअर भागात बदल दिसून आले आहेत. जागतिक बाजारपेठेत, Enyaq अनेक बॅटरी पॅकसह येते, ज्याची रेंज 566 किमी पर्यंत असल्याचा दावा केला जातो. भारत मोबिलिटीमध्ये दाखवलेले एन्याक मॉडेल हे फेसलिफ्टपूर्वीचे व्हेरियंट असू शकते.