फोटो सौजन्य: Social Media
भारतात कितीतरी ऑटो कंपन्या गेल्या अनेक वर्षांपासून दमदार आणि दर्जेदार कार्स ऑफर करत आहे. यातीलच एक ऑटो कंपनी म्हणजे महिंद्रा. देशातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्राने अनेक उत्तम कार्स मार्केटमध्ये लाँच केल्या आहेत. कंपनीने आता इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये सुद्धा आपले पॉल ठेवले आहे.
सध्या मार्केटमध्ये Toyota Innova Hycross ची मागणी वाढताना दिसत आहे. टोयोटा कंपनी ही कार एमपीव्ही सेगमेंटमध्ये ऑफर करते. या कारचे साइज, इंजिन, फीचर्समुळे ही देशात खूप लोकप्रिय ठरली आहे. त्यामुळे या कारवर महिन्यांचा वेटिंग पिरीयड आहे. अशा परिस्थितीत, अनेकांना या कारसाठी थांबायला वेळ नसतो. हीच बाब लक्षात घेऊन आज टोयोटा हायक्रोसला पर्यायी अशा काही बेस्ट कार्सबद्दल जाणून घेऊया.
महिंद्रा XUV 700 ही महिंद्रा ने मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये आणली आहे ज्यामध्ये पाच आणि सात सीट्स पर्याय आहेत. या कारमध्ये शक्तिशाली इंजिनसह उत्कृष्ट डिझाइन आणि फीचर्स प्रदान केली आहेत. ही कार कंपनीने इनोव्हा हायक्रॉसपेक्षा खूपच कमी किंमतीत उपलब्ध करून दिले आहे. महिंद्रा XUV 700 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपये आहे आणि तिच्या टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 25.64 लाख रुपये आहे.
ब्रिटिश ऑटोमेकर एमजी देखील पाच, सहा आणि सात सीट्स पर्यायांसह एमजी हेक्टर/प्लस विक्रीसाठी सादर करते. या कारमध्ये 14 इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे. याशिवाय, ADAS, पॅनोरॅमिक सनरूफ, अँबियंट लाईट्स असे अनेक फीचर्स यात देण्यात आले आहेत. एमजी हेक्टरची एक्स-शोरूम किंमत देखील 13.99 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारचा टॉप व्हेरियंट 22 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत घरी आणता येतो.
टाटा मोटर्स सात सीट्स पर्यायासह टाटा सफारी कार विक्रीसाठी उपलब्ध करून देते. या एसयूव्हीमध्ये शक्तिशाली इंजिन आणि फीचर्स देखील देण्यात आली आहेत. तसेच त्याचे एक्सटिरिअर देखील बरेच चांगले दिसते. टाटा सफारीची सुरुवातीची किंमत 15.50 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरियंटची किंमत 27 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते.
ह्युंदाई अल्काझारचे अपडेटेड व्हर्जन २०२४ मध्येच बाजारात आले आहे. ज्यामध्ये एक्सटिरिअरपासून ते इंटिरिअरपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच, नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. ह्युंदाई अल्काझरची एक्स-शोरूम किंमत 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते, तर याचे टॉप व्हेरियंट 21.55 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे.
जर तुम्हाला कमी बजेटमध्ये एसयूव्ही ऐवजी एमपीव्ही घ्यायची असेल, तर किआ कॅरेन्स हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या एमपीव्हीमध्ये सनरूफ, अँबियंट लाईट, एअर प्युरिफायर इत्यादी अनेक उत्तम फीचर्स देखील देण्यात आली आहेत. या कारची एक्स-शोरूम किंमत 10.52 लाख रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 19.44 लाख रुपयांपर्यंत जाते.