Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

हिरो एक्सपल्स 421 मध्ये नवीन प्लॅटफॉर्म, सुमारे 421 cc इंजिन आणि अ‍ॅडव्हेंचर फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. करिझ्मा XMR 250 मध्ये 249 cc इंजिन आणि स्पोर्टी डिझाइन अपेक्षित आहे. काही मॉडेल्सची लॉन्च तारीख आणि किंमत अद्याप अधिकृत झालेली नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 18, 2026 | 03:40 PM
हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
Follow Us
Follow Us:
  • हिरो करिझ्मा XMR 250 मध्ये 249 cc इंजिन, स्पोर्टी डिझाइन आणि आधुनिक फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
  • एक्सपल्स 421 मध्ये नवीन प्लॅटफॉर्म, अ‍ॅडव्हेंचर हार्डवेअर आणि सुमारे 421 cc इंजिन मिळू शकते.
  • हिरोच्या आगामी यादीत ड्युअल-स्पोर्ट बाइकसोबत स्प्लेंडर इलेक्ट्रिकचाही संभाव्य समावेश असल्याचे संकेत आहेत.
भारतीय मोटरसायकल मार्केटमध्ये प्रीमियम आणि अ‍ॅडव्हेंचर बाइक्सची मागणी वाढत असताना, हिरो मोटोकॉर्प आपल्या नवीन येणाऱ्या मॉडेल्सच्या माध्यमातून या सेगमेंटमध्ये विस्तार करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या आगामी बाइक्समध्ये स्पोर्ट्स बाइक, मोठी अ‍ॅडव्हेंचर बाइक, ड्युअल-स्पोर्ट मॉडेल आणि इलेक्ट्रिक मोटरसायकलचा समावेश असल्याचे समोर आले आहे. यातील काही मॉडेल्स लॉन्चच्या जवळ आहेत, तर काहींच्या बाबतीत अजूनही निश्चित माहिती उपलब्ध झालेली नाही.

हिरो करिझ्मा XMR 250

हिरोची करिझ्मा XMR 250 ही आगामी मॉडेल्सपैकी लवकर सादर होण्याची शक्यता असलेली बाइक आहे. या बाइकचे भारतात प्रदर्शन झाले असून, प्रोडक्शनसाठी तयार स्वरूपातील मॉडेलही पाहायला मिळाले आहे. यात एक्स्ट्रीम 250R प्रमाणे 249 cc लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलिंडर इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन सुमारे 30 hp पॉवर आणि 25 Nm टॉर्क निर्माण करू शकते. 6-स्पीड गिअरबॉक्स, USD फ्रंट फोर्क्स, मोनोशॉक, 17-इंच अलॉय व्हील्स, ड्युअल-चॅनल ABS आणि TFT डिस्प्ले अशी फीचर्स अपेक्षित आहेत. या बाइकची किंमत ₹2 लाखांपेक्षा जास्त असू शकते.

हिरो ग्लॅमर X ABS लाँच; 125cc बाइकमध्ये मिळणार हे खास सेफ्टी फीचर! जाणून घ्या सर्व माहिती

हिरो XPulse 421

हिरो एक्सपल्स 421 ही कंपनीची मोठी अ‍ॅडव्हेंचर बाइक ठरण्याची शक्यता आहे. या मॉडेलची विविध ठिकाणी चाचणी सुरू असून, त्याचा विकास प्रगत टप्प्यात असल्याचे अहवाल सांगतात. या बाइकमध्ये नवीन प्लॅटफॉर्म आणि सुमारे 421 cc क्षमतेचे लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते. लाँग-ट्रॅव्हल सस्पेन्शन, ट्रेलिस फ्रेम, मोठा TFT डिस्प्ले, रायडिंग मोड्स आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स अपेक्षित आहेत. जागतिक पदार्पण EICMA 2026 मध्ये होण्याची शक्यता असून, भारतातील लॉन्च 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला होऊ शकतो. ही बाइक रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 सारख्या मॉडेल्सना टक्कर देऊ शकते.

नवीन ड्युअल-स्पोर्ट आणि इलेक्ट्रिक बाइक

हिरोने भारतात एका छोट्या क्षमतेच्या ड्युअल-स्पोर्ट बाइकचे डिझाइन पेटंट दाखल केले आहे. या मॉडेलमध्ये एअर-कूल्ड इंजिन, किक-स्टार्टर आणि पारंपरिक हार्डवेअर दिसते. इंजिन क्षमता 150 ते 200 cc दरम्यान असण्याचा अंदाज आहे. पण पेटंट दाखल झाले म्हणजे भारतात लॉन्च निश्चित आहे, असे म्हणता येत नाही. ही बाइक निर्यात मार्केटसाठीही विकसित केली जाऊ शकते.

Pulsar Series vs. Splendor Series : ५ वर्षांच्या वापरानंतर दोन्ही गाड्यांचा मेंटेनन्स खर्च, स्पेअर पार्ट्सची उपलब्धता आणि रीसेल व्

याशिवाय, हिरो ‘स्प्लेंडर इलेक्ट्रिक’वरही काम करत असल्याच्या चर्चा आहेत. ही बाइक 2027 च्या आसपास येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कंपनीने अद्याप तिची अधिकृत किंमत, रेंज किंवा लॉन्चची तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात हिरोच्या या मॉडेल्सबाबत ऑफीशल माहितीसाठी वात पाहावी लागणार आहे.

Web Title: Upcoming hero motorcycles xpulse 421 karizma xmr 250 electric dual sport auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती
1

7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती

2027 Kawasaki Z650RS भारतात लाँच; किंमत ₹7.83 लाख, 67.3 bhp पॉवरसह मिळणार निओ-रेट्रो लूक
2

2027 Kawasaki Z650RS भारतात लाँच; किंमत ₹7.83 लाख, 67.3 bhp पॉवरसह मिळणार निओ-रेट्रो लूक

रेनोल्टच्या विक्रीत घट, निसानची 148% वाढ; ऑगस्टमध्ये कोणत्या कारची झाली सर्वाधिक विक्री?
3

रेनोल्टच्या विक्रीत घट, निसानची 148% वाढ; ऑगस्टमध्ये कोणत्या कारची झाली सर्वाधिक विक्री?

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स
4

TVS Ronin मध्ये मोठे अपडेट! नवीन Base+ व्हेरिएंट लाँच; मिळाले खास सेफ्टी आणि टेक फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.