फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर होत असतात. यातही काळानुसार ग्राहकांच्या मागणीत सातत्याने बदल दिसून येत आहे. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये विविध फीचर्स असणाऱ्या दमदार कार ऑफर करतात. अशातच आता येत्या ऑगस्टच्या महिन्यात एक दोन नव्हे तर तब्बल 8 कार्स लाँच होणार आहेत.
दर महिन्याला, भारतीय बाजारात वाहन उत्पादकांकडून अनेक नवीन कार सादर आणि लाँच केल्या जातात. अहवालानुसार, ऑगस्ट 2025 मध्येही अनेक कार सादर आणि लाँच करण्याची तयारी सुरू आहे. पुढील महिन्यात कोणत्या वाहन उत्पादकाकडून कोणत्या कार सादर आणि लाँच केल्या जाऊ शकतात, याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
व्होल्वोने सादर केलेल्या XC60 चा फेसलिफ्ट ऑगस्ट 2025 मध्ये बाजारात लाँच केला जाईल. ही SUV कंपनीकडून अनेक बदलांसह सादर केली जाईल. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार येत्या 1 ऑगस्ट 2025 रोजी बाजारात लाँच केली जाऊ शकते.
चीनच्या बॅटरी इंडस्ट्रीचे टेन्शन वाढले, Tesla चा LG Energy सोबत 35,000 कोटींचा बॅटरी करार
मर्सिडीज भारतात AMG CLE 53 Coupe लाँच करणार आहे. ही कार 12 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे लाँच केली जाईल. त्यात खूप पॉवरफुल इंजिन आणि फीचर्स असण्याची शक्यता आहे.
Vinfast भारतात पहिले वाहन म्हणून VF7 लाँच करण्याची तयारी करत आहे. ही इलेक्ट्रिक SUV जानेवारी 2025 मध्ये ऑटो एक्स्पो दरम्यान देशात सादर करण्यात आली होती. त्यात अनेक उत्तम फीचर्स असतील. ही इलेक्ट्रिक SUV ऑगस्टच्या मध्यापर्यंत लाँच केली जाऊ शकते.
Kiger ही Renault द्वारे सब फोर मीटर SUV सेगमेंटमध्ये देखील ऑफर केली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात त्याचे फेसलिफ्ट लाँच करण्याची तयारी देखील केली जात आहे. माहितीनुसार, या SUV चा फेसलिफ्ट ऑगस्टच्या अखेरीस अधिकृतपणे भारतात आणला जाऊ शकतो.
Honda कडून नवीन Adventure Scooter सादर, लूक असा जो भल्या भल्या बाईकला लाजवेल
सोशल मीडियावर Mahindra सतत माहिती देत आहे की ते 15 ऑगस्ट रोजी बाजारात नवीन SUV सादर करण्याची तयारी करत आहे. यामध्ये Mahindra Vision S, Vision SXT, Vision T आणि Vision X यांचा समावेश आहे. सध्या, या एसयूव्हींबद्दल कंपनीने इतर कोणतीही माहिती पब्लिश केलेली नाही.