
पुढील काही महिन्यात 'या' SUVs मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार!
भारतीय ऑटो मार्केटमध्ये सर्वाधिक विक्री एसयूव्ही सेगमेंटमध्ये होत असते. एसयूव्ही कार्सचा लूक प्रीमियम असण्यासोबतच त्या परफॉर्मन्समध्ये सुद्धा चांगल्या असतात. त्यामुळेच ग्राहक मोठ्या प्रमाणात एसयूव्ही वाहनांना खरेदी करतात. म्हणूनच कंपन्या या सेगमेंटमध्ये असंख्य कार सादर करतात. या बातमीत, आपण जाणून घेऊयात की पुढील काही महिन्यांत कोणत्या एसयूव्ही लाँच होऊ शकतात.
2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर Tata Tigor चा EMI फक्त असेल ‘इतकाच’, असा असेल फायनान्स प्लॅन
भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Hyundai Venue ऑफर केली जाते. कंपनी येत्या 4 नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे भारतीय बाजारात या SUV चे नवीन जनरेशन लाँच करणार आहे. या SUV च्या नवीन जनरेशनबद्दलची माहिती कंपनीने नुकतीच प्रसिद्ध केली आहे. ही कार अनेक उत्तम फीचर्ससह लाँच केली जाईल.
Tata Motors कडून सध्या देशातील अनेक सेगमेंटमध्ये वाहनांची विक्री केली जाते. कंपनी नोव्हेंबर महिन्यात Tata Sierra लाँच करू शकते, अशी माहिती समोर आली आहे. जरी याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरी नोव्हेंबरच्या शेवटी ही SUV भारतीय बाजारात सादर केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या SUV चा प्रॉडक्शन-रेडी व्हेरिएंट याआधी Auto Expo 2025 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता.
Renault कंपनीकडून देखील Duster ची नवी जनरेशन लाँच करण्याची तयारी सुरू आहे. जरी अधिकृत लाँच डेट अद्याप जाहीर झालेली नाही, तरी या SUV ची देशांतर्गत बाजारपेठेत मोठी चर्चा आहे. अनेक देशांमध्ये ही एसयूव्ही Dacia Duster नावाने विकली जाते. तसेच, या नव्या मॉडेलमध्ये हायब्रिड इंजिन पर्यायही उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे.
आजपासून VinFast VF6 आणि VF7 ची डिलिव्हरी सुरु, सिंगल चार्जवर मिळेल 510 किमीची रेंज
Nissan कंपनीने काही काळापूर्वी Tekton SUV ची पहिली झलक दाखवली होती. कंपनीकडून ही SUV पुढील वर्षाच्या सुरुवातीस लाँच केली जाऊ शकते, अशी अपेक्षा आहे. जरी लाँचची अचूक तारीख सध्या जाहीर झालेली नसली, तरी हे निश्चित आहे की ही एसयूव्ही Renault Duster च्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. मात्र, दोन्ही SUV मध्ये डिझाइन आणि फीचर्सच्या दृष्टीने काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील.