
किआ सेल्टोसची 13,000 युनिट्सपेक्षा जास्त विक्री
ऑक्टोबरमधील या यशात किआ सेल्टोसचा मोठा वाटा आहे. या मिडसाइज SUV ची विक्री 13,000 युनिट्सच्या पुढे गेली आहे. जानेवारी 2026 मध्ये नवीन जनरेशन लाँच झाल्यापासून सेल्टोसची दर महिन्याला सरासरी 10,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री होत आहे. पुढील वर्षी या SUV मध्ये स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंट सादर होण्याची शक्यता आहे. याशिवाय कॉम्पॅक्ट SUV प्रकारातील किआ सोनेटनेही कंपनीच्या सेलमध्ये चांगले योगदान दिले. किआ कॅरेन्स आणि कॅरेन्स क्लॅव्हिसच्या CNG व्हेरिएंटनाही चांगला प्रतिसाद मिळाला. या दोन्ही मॉडेल्सच्या CNG व्हेरिएंटचा ऑक्टोबरमधील एकूण विक्रीत जवळपास 10% वाटा होता.
इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीत 31% वाढ
किआच्या इलेक्ट्रिक वाहन व्यवसायानेही ऑक्टोबरमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम मासिक विक्री नोंदवली. सप्टेंबरच्या तुलनेत EV विक्रीत 31% वाढ झाली. नवीन सायरोस EV आणि कॅरेन्स क्लॅव्हिस EV या मॉडेल्समुळे कंपनीच्या इलेक्ट्रिक वेईकलला सेलला चालना मिळाली आहे.
2026 मध्ये 2.86 लाख वाहनांची विक्री
जानेवारी ते ऑक्टोबर 2026 या 10 महिन्यांत किआने एकूण 2,86,470 वाहनांची विक्री केली आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत 2,36,000 च्या आसपास वाहनांची विक्री झाली होती. यंदाची विक्री 21.31% जास्त आहे. विशेष म्हणजे 2025 या संपूर्ण कॅलेंडर वर्षात कंपनीने विकलेल्या 2,80,286 वाहनांचा आकडाही किआने ऑक्टोबरमध्येच पार केला.
दरम्यान, किआने सोरेंटो SUV च्या माध्यमातून प्रीमियम SUV मार्केटमध्येही प्रवेश केला आहे. ही SUV हायब्रिड आणि डिझेल व्हेरिएंटमध्ये येते. आंध्र प्रदेशातील अनंतपूर प्लांटमध्ये तिचे स्थानिक प्रोडक्शन केले जाते.
कंपनीने Assured Buyback Programme देखील विस्तारले आहे. पात्र पेट्रोल, डिझेल आणि हायब्रिड वाहनांसाठी 75% पर्यंत, तर इलेक्ट्रिक वाहनांसाठी 70% पर्यंत रिसेल व्हॅल्यू मिळू शकते. याशिवाय पात्र EV साठी Battery-as-a-Service आणि लाइफटाइम बॅटरी वॉरंटीची सुविधाही आहे. सध्या किआचे नेटवर्क 438 शहरांमध्ये 925 टचपॉइंट्स आणि 144 प्री-ओन्ड आउटलेट्सपर्यंत पोहोचले आहे.
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: ऑक्टोबर 2026 मध्ये किआ इंडियाने किती कार्स विकल्या?
उत्तर: किआ इंडियाने ऑक्टोबर 2026 मध्ये एकूण 33,462 वाहनांची विक्री केली. ऑक्टोबर 2025 मधील 29,556 युनिट्सच्या तुलनेत ही 13.22% वाढ आहे.
प्रश्न 2: ऑक्टोबर 2026 मध्ये किआ सेल्टोसची किती विक्री झाली?
उत्तर: किआ सेल्टोसच्या 13,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली. जानेवारी 2026 मध्ये नवीन जनरेशन आल्यापासून या SUV ची दर महिन्याला सरासरी 10,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री होत आहे.
प्रश्न 3: किआच्या इलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीत किती वाढ झाली?
उत्तर: सप्टेंबर 2026 च्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये किआच्या इलेक्ट्रिक वाहन विक्रीत 31% वाढ झाली. सायरोस EV आणि कॅरेन्स क्लॅव्हिस EV या मॉडेल्सनी या वाढीत योगदान दिले.