फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे इंधनाच्या किमतीत वाढ होत असतानाच दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद देत आहे. सरकार देखील EVs च्या विक्रीला प्रोत्साहन देत आहे. यामुळेच अन्य देशातील ऑटो कंपन्या सुद्धा भारतात इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे Tesla ची भारतात झालेली एंट्री. आता लवकरच व्हिएतनामी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी Vinfast भारतात येणार आहे.
लवकरच विनफास्ट भारतीय ऑटो बाजारात त्यांच्या दोन इलेक्ट्रिक SUV VF 6 आणि VF 7 लाँच करणार आहे. कंपनीने याचे बुकिंग सुरू केले आहे. अलीकडेच कंपनीने Vinfast Minio Green EV साठी पेटंट दाखल केले आहे. ही एक छोटी इलेक्ट्रिक कार असणार आहे. या इलेक्ट्रिक कारचा आकार टाटा नॅनोपेक्षा लहान असणार आहे. भारतीय बाजारात ही कार एमजी कॉमेटशी स्पर्धा करेल. विनफास्टची ही छोटी इलेक्ट्रिक कार कोणत्या खास फीचर्ससह येणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अरे ही खरंच बाईक आहे का? Ola कडून इलेक्ट्रिक बाईक Diamondhead चा टिझर प्रदर्शित
व्हिएतनामी बाजारात, विनफास्ट मिनिओ ग्रीन ही व्यावसायिक इलेक्ट्रिक वाहन म्हणून उपलब्ध आहे. त्याची लांबी 3,090 मिमी आहे. ती 2-डोअर ऑल-इलेक्ट्रिक सुपरमिनी सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. यात उंच-बॉय प्रोफाइल आहे, जे सहजपणे लोकांचे लक्ष वेधून घेते. यात एक लहान बोनेट, गोलाकार व्हील आर्च, 13-इंच चाके आणि पारंपारिक दरवाजाचे हँडल आहेत. मागील बाजूस, EV मध्ये शार्क फिन अँटेना, एक फ्लॅट विंडस्क्रीन आणि उभ्या स्टॅक केलेले टेल लॅम्प देखील आहेत. ही कार एकूण 6 कलर ऑप्शन्समध्ये आणले जाईल.
यात डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले असून तो इन्फोटेनमेंट सिस्टमचेही काम करतो. डॅश, डोअर हँडल्स आणि अपहोल्स्ट्रीवर निळ्या रंगाचे ॲक्सेंटसह राखाडी इंटीरियर थीम देण्यात आली आहे. वैशिष्ट्यांमध्ये रोटरी डायल, काही फिजिकल बटणे आणि फ्लॅट-बॉटम 2-स्पोक स्टीअरिंग व्हीलचा समावेश आहे. याशिवाय, 4-वे ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, फॅब्रिक सीट अपहोल्स्ट्री आणि डे-नाईट इंटीरियर रियरव्ह्यू मिररची सुविधाही आहे.
सुरक्षिततेसाठी ड्रायव्हर एअरबॅग, ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम देण्यात आले आहेत.
परफॉर्मन्सच्या बाबतीत, विनफास्ट मिनीओ ग्रीनमध्ये 14.7 kWh बॅटरी पॅक असू शकतो. यात 20 kW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून ती 27 PS पॉवर आणि 65 Nm पीक टॉर्क निर्माण करते. याचा टॉप स्पीड 80 किमी/तास असून, NEDC मानकांनुसार रेंज 170 किमी आहे. ही EV 12 kW पर्यंतच्या चार्जिंगला सपोर्ट करते.