Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये बसणारा हार्वेस्टर! महिंद्राचा 50HP Harvest Yuva  लाँच, कापणीचा खर्च वाचवण्यासाठी नवी मशीन

अरुंद ग्रामीण रस्ते, ओलसर शेतजमीन आणि कापणीचा वाढता खर्च या समस्यांवर महिंद्राने Harvest Yuva हा Compact Harvester आणला आहे. महाराष्ट्रासह 4 राज्यांत विक्री सुरू झाली असून, छोट्या शेतकऱ्यांना याचा किती फायदा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 17, 2026 | 04:43 PM
Mahindra Harvest Yuva 50HP Compact Harvester Launch (फोटो सौजन्य-AI एआय)

Mahindra Harvest Yuva 50HP Compact Harvester Launch (फोटो सौजन्य-AI एआय)

Follow Us
Follow Us:
  • महिंद्रा Harvest Yuva मध्ये 50HP इंजिनसह 4WD सिस्टीम देण्यात आली असून, ओल्या आणि कोरड्या जमिनीवर वापर शक्य आहे.
  • भात, गहू, सोयाबीन आणि मका या 4 पिकांची कापणी करण्यासाठी मशीनची रचना करण्यात आली आहे.
  • मोठ्या हार्वेस्टरच्या तुलनेत 25% कमी किंमत आणि 7 लाख रुपयांपर्यंत बचतीचा कंपनीचा दावा आहे.

शेतीमध्ये मजुरांची कमतरता आणि कापणीसाठी लागणारा वाढता खर्च लक्षात घेता महिंद्रा अँड महिंद्राने Mahindra Harvest Yuva नावाचा नवीन 50HP Compact Harvester लाँच केला आहे. विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेल्या या Self Propelled Harvester मुळे कमी जागेत आणि अरुंद रस्त्यांवरून शेतीपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. कंपनीने हे मशीन किफायतशीर दरात सादर करण्यावर भर दिला आहे.

महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर

छोट्या शेतांसाठी खास रचना

महिंद्रा Harvest Yuva मध्ये 50HP इंजिन आणि 4WD म्हणजेच फोर व्हील ड्राइव्ह सिस्टीम देण्यात आली आहे. त्यामुळे ओलसर तसेच कोरड्या जमिनीवर हे मशीन वापरता येते. भात, गहू, सोयाबीन आणि मका यांसारख्या वेगवेगळ्या पिकांची कापणी करण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. विशेषतः चिखल असलेल्या भातशेतीमध्ये 4WD सिस्टीममुळे चांगले ट्रॅक्शन मिळण्यास मदत होते.

या हार्वेस्टरमध्ये 9.3 फूट आणि 10.9 फूट अशा 2 प्रकारच्या कटर बारचे ऑप्शन देण्यात आले आहेत. त्याची ट्रॅक रुंदी 8 फूट असून, बंद स्वरूपातील अनलोडिंग ट्यूबमुळे अरुंद ग्रामीण रस्त्यांवरून वाहतूक करणे सोपे होते. कटर बार मशीनला जोडलेलाच ठेवून शेतापर्यंत जाता येते. त्यामुळे प्रत्येक वेळी तो वेगळा काढण्याची आणि पुन्हा जोडण्याची गरज पडत नाही.

महिंद्राचा ट्रॅक्टर विक्रीवाढीचा अंदाज घटवला! FY27 मध्ये वाढ जवळपास शून्य; मान्सूनचा फटका

ऑपरेटरच्या सोयीसाठी खास फीचर्स

Harvest Yuva मध्ये कमी उंचीवर ऑपरेटर स्टेशन, सहप्रवाशासाठी स्वतंत्र सीट आणि सेल्फ क्लीनिंग रेडिएटर देण्यात आला आहे. इंजिन मागच्या बाजूला बसवण्यात आल्यामुळे ऑपरेटरला जाणवणारा उष्णतेचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यामध्ये हायड्रॉलिक रील अ‍ॅडजस्टर, प्रॉन्ग कटर आणि फीडर रिव्हर्सर यांसारखी फीचर्स आहेत. पिकांची उंची आणि घनतेनुसार कापणीमध्ये बदल करता येतो. मशीनमध्ये पिकांचे अवशेष अडकल्यास ऑपरेटर स्टेशनवरून लीव्हरच्या मदतीने ते बाहेर काढता येतात. हलक्या वजनाची चेन-ड्रिव्हन यंत्रणा जमिनीवरील दाब कमी ठेवण्यास मदत करते.

किंमत आणि विक्री कुठे सुरू?

महिंद्राच्या दाव्यानुसार, Harvest Yuva ची किंमत काही मोठ्या सेल्फ-प्रोपेल्ड हार्वेस्टरच्या तुलनेत 25% पर्यंत कमी आहे. म्हणजेच शेतकऱ्यांची 7 लाख रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. या मशीनवर कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी दिली जाणार आहे.

सध्या महिंद्रा Harvest Yuva महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेश या 4 राज्यांमध्ये अव्हेलेबल आहे. लहान शेतकरी तसेच हार्वेस्टर भाड्याने देणाऱ्या ग्रामीण उद्योजकांसाठी हे मशीन उत्पन्नाचे साधन ठरू शकते.

Web Title: Mahindra harvest yuva 50hp compact harvester small farms auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 04:43 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra

संबंधित बातम्या

महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर
1

महिंद्रा रेसिंगची मोठी घोषणा! फॉर्म्युला ई Gen4 सीझनसाठी M13Electro कार सादर

JSW Motors ची ऑफीशियल वेबसाइट सुरू! 4 डिसेंबरला पहिली SUV लाँच होणार
2

JSW Motors ची ऑफीशियल वेबसाइट सुरू! 4 डिसेंबरला पहिली SUV लाँच होणार

2027 Royal Enfield Interceptor 650 मध्ये 750cc इंजिन नाही! जुन्याच इंजिनसह येणार नवीन बाईक
3

2027 Royal Enfield Interceptor 650 मध्ये 750cc इंजिन नाही! जुन्याच इंजिनसह येणार नवीन बाईक

ह्युंदाईची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार? Hyundai Ioniq P Electric SUV; डिसेंबर 2026 मध्ये होणार एन्ट्री! पाहा फीचर्स
4

ह्युंदाईची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार? Hyundai Ioniq P Electric SUV; डिसेंबर 2026 मध्ये होणार एन्ट्री! पाहा फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.