Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विंटेज कार रिस्टोरेशन: जुन्या आठवणींना जिवंत करणारा एक ‘रॉयल’ व्यवसाय

जुनी गंजलेली वाहने मूळ रूपात आणण्याच्या कलेला 'विंटेज कार रिस्टोरेशन' म्हणतात. यात १९२०-१९७० मधील गाड्यांचे इंजिन, पेंटिंग व डिझाईन हुबेहूब तयार करावे लागते. भारतात हा एक अतिशय रॉयल आणि फायदेशीर व्यवसाय बनला असून, शौकीन लोक यासाठी लाखो रुपये खर्च करतात. गंजलेल्या गाड्यांना नवजीवन देणारा हा तांत्रिक कौशल्याचा उद्योग आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 17, 2026 | 10:52 PM
विंटेज कार रिस्टोरेशन: जुन्या आठवणींना जिवंत करणारा एक ‘रॉयल’ व्यवसाय
Follow Us
Follow Us:

जुनी, गंजलेली आणि अडगळीत पडलेली एखादी गाडी जेव्हा पुन्हा रस्त्यावर दिमाखात धावते, तेव्हा केवळ एक वाहन धावत नसते, तर इतिहासाचे एक सोनेरी पान जिवंत होत असते. या प्रक्रियेला ‘विंटेज कार रिस्टोरेशन’ (Vintage Car Restoration) असे म्हणतात. ही केवळ मेकॅनिकल दुरुस्ती नाही, तर ती एक कला, आवड आणि सद्यस्थितीत वेगाने वाढणारा एक फायदेशीर व्यवसाय आहे.

इतिहासाला नवे आयुष्य देण्याची कला

विंटेज कार रिस्टोरेशन म्हणजे जुन्या काळातील गाड्यांना त्यांच्या मूळ (Original) स्वरूपात परत आणणे. यात १९२० ते १९७० च्या दशकातील गाड्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि संयमाची असते. अनेकदा या गाड्यांचे सुटे भाग (Spare Parts) बाजारात मिळत नाहीत. अशा वेळी मूळ डिझाईनचा अभ्यास करून, लेथ मशीनवर किंवा थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून ते भाग स्वतः तयार करावे लागतात. इंजिनचे रिपेअरिंग, टेंटिंग-पेंटिंग आणि अंतर्गत सजावट  हुबेहूब मूळ गाडीसारखीच करावी लागते. यासाठी महिने, कधीकधी तर वर्षे लागतात.

एक नवा आणि श्रीमंत व्यवसाय

भारतात, विशेषतः महाराष्ट्रात विंटेज गाड्यांचे शौकीन मोठ्या प्रमाणावर आहेत. अनेक राजघराणे, उद्योगपती आणि सेलिब्रिटींकडे अशा गाड्यांचा संग्रह असतो. त्यामुळे या क्षेत्रात आता व्यावसायिकता आली आहे.

सायरन ते स्पीड! जगभरातील पोलीस दलांच्या ताफ्यातील 10 दमदार बाईक्स! आत्ताच जाणून घ्या

कमाईची मोठी संधी

एका विंटेज कारचे रिस्टोरेशन करण्यासाठी ५ लाख रुपयांपासून ते २५-३० लाख रुपयांपर्यंत (किंवा त्याहून अधिक) खर्च येतो. अनुभवी मेकॅनिक आणि डिझायनर्सना यातून मोठी आर्थिक कमाई होते.

गुंतवणूक आणि नफा

अनेक व्यावसायिक जुन्या गाड्या भंगाराच्या भावात किंवा स्वस्तात विकत घेतात. त्यावर मेहनत घेऊन, ती रिस्टोर करून लाखो-करोडो रुपयांना विंटेज कार लिलावात किंवा संग्राहकांना (Collectors) विकतात.

तुम्लाहाही विंटेज कार आवडतात? तर ही आहेत भारतातील ऑटोमोबाईल संग्रहालये! एका क्लिकवर पाहून घ्या

पर्यटन आणि इव्हेंट्स

विंटेज गाड्यांचा वापर मोठ्या हॉटेल्समध्ये, चित्रपटांच्या शूटिंगसाठी आणि विवाहसोहळ्यांमध्ये भाड्याने देण्यासाठी केला जातो, ज्यातून नियमित उत्पन्न मिळते.

विंटेज कार रिस्टोरेशन हा केवळ मेकॅनिक्सचा व्यवसाय उरलेला नाही. हा जुन्या आठवणींना उजाळा देणारा आणि तांत्रिक कौशल्याचा कस लावणारा एक प्रतिष्ठित उद्योग बनला आहे. जर तुमच्याकडे संयम, गाड्यांबद्दलचे प्रेम आणि अचूक कौशल्य असेल, तर हा व्यवसाय तुम्हाला पैशांसोबतच समाजात एक वेगळी प्रतिष्ठा मिळवून देऊ शकतो.

Web Title: Vintage car restoration auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 10:52 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.