
BMW F 450 R ची निर्मिती भारतात टीव्हीएसच्या प्रोडक्शन प्रोजेक्टमध्ये केली जाणार असून, येथून युरोपातील विविध देशांमध्येही तिची एक्स्पोर्ट होण्याची शक्यता आहे. टीझरमध्ये बाइकचा आक्रमक आणि स्पोर्टी लूक पाहायला मिळतो. मस्क्युलर फ्युल टँक, धारदार टँक एक्स्टेंशन आणि उंचावलेला रिअर प्रोफाइल यामुळे बाइकला दमदार स्ट्रीटफायटर लूक मिळतो. अंडरबेली एक्झॉस्टची झलकही टीझरमध्ये दिसते.
2027 Kawasaki Z650RS भारतात लाँच; किंमत ₹7.83 लाख, 67.3 bhp पॉवरसह मिळणार निओ-रेट्रो लूक
नव्या F 450 R च्या अंडरपिनिंगमध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. बाइकला पुढे आणि मागे 17-इंच अलॉय व्हील्स तसेच रोड-बायस्ड टायर्स मिळू शकतात. दोन्ही बाजूंना डिस्क ब्रेक्स दिले जाण्याची शक्यता आहे. फीचर्सच्या बाबतीत F 450 GS कडून 6.5-इंच TFT डिस्प्ले आणि मल्टीकंट्रोलर मिळू शकतो. यात Pure Ride Screen आणि Sport Screen असे डिस्प्ले मोडही असण्याची शक्यता आहे.
इलेक्ट्रॉनिक्समध्ये Rain, Road, Enduro आणि Enduro Pro असे राइडिंग मोड्स मिळू शकतात. याशिवाय व्हीली कंट्रोल, रिअर-व्हील ABS, ABS Pro, Dynamic Brake Control, Dynamic Traction Control आणि Engine Drag Torque Control यांसारख्या सुविधा मिळण्याची शक्यता आहे. Easy Ride Clutch आणि Shift Assistant Pro सारखी फीचर्सही टॉप व्हेरिएंटमध्ये दिली जाऊ शकतात.
Triumph Scrambler 400 X पावर, पर्फोर्मंस आणि इंजिनाची A टू Z माहिती! जाणून घ्या
पॉवरट्रेनमध्ये F 450 GS प्रमाणेच 420cc ट्विन-सिलेंडर इंजिन वापरले जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन 8750 rpm वर 47 bhp पॉवर आणि 6750 rpm वर 43 Nm टॉर्क तयार करू शकते. इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स मिळेल. भारतात या बाइकची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 4.50 लाख ते 5 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते. भारतीय मार्केटमध्ये तिची थेट टक्कर अप्रिलिया ट्युओनो 457 आणि केटीएम 390 ड्यूक R सारख्या बाइक्सशी होऊ शकते.