
फोटो सौजन्य - Social Media
सध्या सोशल मीडिया प्रसिद्धी मिळवण्याचे प्रमुख माध्यम आहे. येथे प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणतेही पैसे मोजावे लागत नाहीत. अशामध्ये टाटाची नवीन SUV ‘2026 Punch Facelift’ ची कमाल सोशल मीडियावर धमाल करत आहे. सोशल मीडियावर एका ऑटो क्षेत्राच्या चाहत्याने टेस्ट घेतली आहे. कडे-कपारी, डोंगर माथ्यावर ही गाडी किती टिकून राहते? धोक्यच्या रस्त्यात या गाडी कमाल करू शकते की नाही? या सगळ्या गोष्टी या टेस्टमधून बऱ्यापैकी समोर आले आहेत.
ही व्हिडीओ @marathi_autoguru या सोशल मीडिया हँडलवर शेअर करण्यात आले आहे. या टेस्टमध्ये नवी कोरी गाडी चक्क Ultimate 90° उतारावर घालण्यात आली आहे आणि गंमत म्हणजे त्यात Tata SUV ‘2026 Punch Facelift’ने कमालच केली आहे. कोणत्याही अपघाताशिवाय Tata SUV ‘2026 Punch Facelift’ ने सहजरित्या हा अवघड टप्पा पार केला आहे. यावर ऑटो चाहत्यांनी त्यांचे अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत पण सगळ्यात महत्वाचे म्हणजे टाटा पंचने हा महत्वाचा टप्पा पार केलं आहे.
‘टाटा पंच SUV पंचलीफ्ट’ चे काही महत्वाचे फीचर्स
टाटा मोटर्सने २०२६ साली आपल्या लोकप्रिय Tata Punch micro-SUV ला पहिलं मोठं फेसलिफ्ट सादर केलं आहे. नवीन अपग्रेडमुळे डिझाईन, इंजिन, फीचर्स आणि सुरक्षा या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा दिसते. ही गाडी शहरातही सोयीची आणि हायवेवरही योग्य अशी बनवण्यात आली आहे. नवीन फेसलिफ्टमध्ये टाटा मोटर्सने 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे 120 PS पॉवर आणि 170 Nm टॉर्क देतं. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत जोडलेलं आहे आणि पारंपरिक NA पेट्रोलपेक्षा जास्त परफॉर्मन्स देतं.
याशिवाय,1.2-लिटर नॅचरलली एस्पिरेटेड पेट्रोल सुमारे 88 PS / 115 Nm,1.2-लिटर CNG सुमारे 73.4 PS / 103 Nm, हे दोन्ही इंजिन 5-स्पीड मॅन्युअल किंवा AMT (ऑटोमेटिक) ट्रान्समिशनसह उपलब्ध आहेत. टर्बो इंजिनमुळे Punch ला शहरात जलद गती, चांगली थ्रॉटल रिस्पॉन्स आणि अधिक उत्साही ड्रायव्हिंग अनुभव मिळतो.
फेसलिफ्टमध्ये Punch ला अधिक आधुनिक आणि बोल्ड लुक दिलं आहे, या लुकमध्ये नवीन LED हेडलॅम्प्स आणि DRLs, रेकनेक्टेड LED टेल लाइट्स, रेडिझाईन ग्रिल आणि बंपर, 16-इंच डायमंड-कट अलॉय व्हील्स हे बदल गाडीचा लुक अधिक आकर्षक आणि SUV-सारखा बनवतात.