
फोटो सौजन्य: Pinterest
Maruti, Tata, आणि Mahindra ला ‘या’ कारने आणलं टेन्शनमध्ये! तब्बल 5 लाख युनिट्सची केली विक्री
अलीकडेच टाटा मोटर्सने पंच फेसलिफ्ट लाँच केले आहे. ही एसयूव्ही सीएनजीसह देखील उपलब्ध आहे. एसयूव्हीचा सीएनजी व्हेरिएंट Smart CNG म्हणून ऑफर केला जातो. या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट 6.70 लाखांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. जर तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला नोंदणी कर म्हणून सुमारे 47000 आणि विम्यासाठी सुमारे 37000 रुपये भरावे लागतील. त्यानंतर, या कारची ऑन-रोड किंमत 7.54 लाख रुपये होईल.
जर तुम्ही टाटा पंचचा CNG व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून या कारच्या एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज दिले जाईल. अशा परिस्थितीत 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 6.54 लाख रुपयांची रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून घ्यावी लागेल. जर बँकेकडून 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांच्या कालावधीसाठी 6.54 लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले, तर पुढील सात वर्षांसाठी तुम्हाला दरमहा केवळ 10,526 रुपयांचा EMI भरावा लागेल.
फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Wagon R थेट तुमच्या दारात उभी! जाणून घ्या Down Payment आणि EMI
9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 6.54 लाख रुपयांचे कार लोन घेतल्यास, सात वर्षांपर्यंत दरमहा 10,526 रुपयांची EMI भरावा लागेल. या कालावधीत टाटा पंच फेसलिफ्टच्या बेस व्हेरिएंटसाठी तुम्हाला सुमारे 2.30 लाख रुपये फक्त व्याजापोटी द्यावे लागतील. त्यामुळे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज यांचा समावेश केल्यानंतर या कारची एकूण किंमत सुमारे 9.84 लाख रुपयांपर्यंत जाईल.