Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फोक्सवॅगन ID. टिगुआन इलेक्ट्रिक ऑक्टोबरमध्ये येणार; ID.4 आणि ID.5 ची जागा घेणार!

फोक्सवॅगन आता आपल्या लोकप्रिय टिगुआन नावाला इलेक्ट्रिक अवतार देणार आहे. नवीन ID. टिगुआन ऑक्टोबरमध्ये समोर येणार असून ती ID.4 आणि ID.5 ची जागा घेणार आहे. पण कंपनीने EV साठी हेच नाव का निवडले?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 30, 2026 | 04:06 PM
फोक्सवॅगन ID. टिगुआन इलेक्ट्रिक ऑक्टोबरमध्ये येणार; ID.4 आणि ID.5 ची जागा घेणार!
Follow Us
Follow Us:
  • फोक्सवॅगन ID. टिगुआन इलेक्ट्रिक SUV ऑक्टोबरमध्ये सादर होणार असून 2027 मध्ये मार्केटमध्ये येणार आहे.
  • नवीन इलेक्ट्रिक टिगुआन ID.4 आणि ID.5 ची जागा घेणार असून सध्याच्या टिगुआनसोबत विकली जाईल.
  • प्रशस्त केबिन, प्रीमियम डिझाइन आणि नवीन टेक्नोलॉजी ही या इलेक्ट्रिक SUV ची प्रमुख वैशिष्ट्ये असतील.
इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये फोक्सवॅगन आता आपल्या लोकप्रिय टिगुआन नावाचा वापर करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची नवीन फोक्सवॅगन ID. टिगुआन इलेक्ट्रिक SUV ऑक्टोबरच्या सुरुवातीला सादर केली जाणार आहे. 2027 च्या सुरुवातीला तिची ग्लोबल मार्केटमध्ये एंट्री होण्याची शक्यता आहे. ही SUV कंपनीच्या ID.4 आणि ID.5 ची जागा घेणार आहे.

टिगुआन नावाला मोठा वारसा
फोक्सवॅगनने स्वतंत्र इलेक्ट्रिक नाव देण्याऐवजी लोकप्रिय टिगुआन नाव इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये नेण्याचा निर्णय घेतला आहे. 2021 पासून ID.4 आणि ID.5 ची 9.5 लाखांपेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली आहे. तर जगभरात टिगुआनच्या 8.3 कोटींपेक्षा जास्त युनिट्सचे प्रोडक्शन झाले आहे. त्यामुळे या नावाशी मोठा कस्टमर बेस जोडलेला आहे.

ऑक्टोबरमध्ये लाँच होणार 10 पेक्षा जास्त नवीन कार! SUV, EV आणि सेडानचा बाजार भरणार!

पेट्रोल टिगुआनसोबतही मिळणार इलेक्ट्रिक ऑप्शन
महत्त्वाची बाब म्हणजे नवीन ID. टिगुआन सध्याच्या पेट्रोल, डिझेल आणि प्लग-इन हायब्रिड टिगुआनची जागा घेणार नाही. दोन्ही मॉडेल्स वेगवेगळ्या पॉवरट्रेनसह एकाच वेळी विकली जाण्याची शक्यता आहे. ID. टिगुआन ही ID.4 आणि ID.5 ची इलेक्ट्रिक उत्तराधिकारी म्हणून काम करेल.

डिझाइनमध्ये मोठे बदल
नवीन इलेक्ट्रिक SUV ला सध्याच्या टिगुआनपेक्षा वेगळी डिझाइन भाषा मिळणार आहे. फोक्सवॅगनच्या मते, या SUV मध्ये तिच्या सेगमेंटपेक्षा जास्त मोठ्या वाहनासारखा रोड प्रेझेन्स दिसेल. सध्या कॅमोफ्लाज केलेल्या प्रोटोटाइपची लास्ट टेस्ट सुरू असून ऑक्टोबरमध्ये प्रोडक्शन-स्पेक डिझाइन समोर येईल.

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

इलेक्ट्रिक रेंजमध्ये नवीन नामकरणाची सुरुवात
फोक्सवॅगन ID. पोलो आणि ID. क्रॉसनंतर ID. टिगुआनच्या माध्यमातून आपल्या इलेक्ट्रिक मॉडेल्सना लोकप्रिय नावांशी जोडत आहे. कंपनीला भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी स्वतंत्र नावांपेक्षा ओळखीच्या मॉडेल नेमप्लेटचा वापर वाढवायचा आहे.

नवीन ID. टिगुआनमध्ये प्रशस्त केबिन, सोपे कंट्रोल्स, नवीन टेक्नोलॉजी आणि जास्त प्रीमियम डिझाइनवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे ही SUV फोक्सवॅगनच्या पुढच्या पिढीच्या इलेक्ट्रिक मॉडेल्समधील महत्त्वाची कार ठरू शकते.

Web Title: Volkswagen id tiguan electric suv global debut details auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 04:06 PM

Topics:  

  • automobile
  • best suv cars
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

VinFast India : भारतात विनफास्टची मोठी तयारी; इलेक्ट्रिक स्कूटर आणि स्पोर्ट्स बाइकचे पेटंट दाखल!
1

VinFast India : भारतात विनफास्टची मोठी तयारी; इलेक्ट्रिक स्कूटर आणि स्पोर्ट्स बाइकचे पेटंट दाखल!

SUV ची क्रेझ असतानाही भारतात MPV मार्केटची मोठी झेप! 4 वर्षांत विक्री जवळपास दुप्पट
2

SUV ची क्रेझ असतानाही भारतात MPV मार्केटची मोठी झेप! 4 वर्षांत विक्री जवळपास दुप्पट

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?
3

टीव्हीएस Apache RTR 125 LC vs हिरो Xtreme 125R vs बजाज पल्सर 125 vs होंडा CB125 Hornet; कोणती बाईक ठरतेय बेस्ट?

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!
4

यावर्षीच्या भारतातील टॉप 10 EV Brands!  टाटा पहिल्या क्रमांकावर, महिंद्राची मोठी झेप; MGला टाकले मागे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.