फोटो सौजन्य; Instagram
Volkswagen India चे ब्रँड डायरेक्टर Nitin Kohli यांनी सांगितले की, नवीन Taigun ही ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाची पुढची पायरी आहे. या SUV चा डिझाइन आता अधिक मजबूत आणि आकर्षक बनवण्यात आला आहे. तसेच, या सेगमेंटमधील उत्कृष्ट फीचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. Volkswagen च्या परंपरेप्रमाणे ही कार चालवताना रोमांचक अनुभव देईल.
तुम्ही तुमच्या कारची Manufacturing Date कशी ओळखाल? प्रत्येक कारवर असतो ‘हा’ खास नंबर
ही SUV खास भारतीय ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून, दररोजच्या ड्रायव्हिंगमध्ये अधिक आत्मविश्वास मिळावा यासाठी यामध्ये विशेष लक्ष दिले गेले आहे.
नवीन Taigun चा डिझाइन अधिक दमदार आणि मजबूत आहे. गाडीच्या बॉडीवर असलेल्या शार्प लाईन्समुळे ती अधिक पावरफुल SUV असल्याचा फील देते. यामध्ये दिलेले प्रीमियम फीचर्स तिला इतर गाड्यांपेक्षा वेगळी ओळख देतात. ऑन-रोड ही SUV अधिक स्थिर आणि मजबूत दिसते.
नवीन Taigun मध्ये आधीचेच इंजिन पर्याय कायम ठेवले जाणार आहेत, मात्र गिअरबॉक्समध्ये काही बदल अपेक्षित आहेत.
या SUV चा मुकाबला Hyundai Creta, Kia Seltos, Maruti Grand Vitara, Toyota Hyryder आणि Honda Elevate यांसारख्या लोकप्रिय गाड्यांशी होणार आहे.
या नवीन Taigun बाबत अधिक माहिती 9 एप्रिल 2026 रोजी लाँचच्या वेळी समोर येणार आहे.






