मुंबईत नवीन इलेक्ट्रिक कार Volvo EX 30 सादर
Volvo कार इंडियातर्फे नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही EX30 अधिकृतपणे सादर करण्यात आली आहे. इच्छुक खरेदीदारांना मुंबईतील KIFS Volvo Cars (अंधेरी पश्चिम आणि प्रभादेवी) येथे टेस्ट ड्राइव्ह घेण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच ग्राहक कारची प्री बुकिंग करून डिलिव्हरीच्या वेळी विशेष डिस्काउंट मिळवू शकतात. या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्हीची अधिकृत किंमत सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर केली जाणार असून, ऑक्टोबर 2025 पासून डिलिव्हरी सुरू होईल. कारचे उत्पादन कर्नाटकातील बंगळुरू येथील होसाकोटे कारखान्यात केले जात आहे.
ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! GST कपातीमुळे पेट्रोल-डिझेल वाहने स्वस्त होणार; TVS चे मोठे विधान
वॉल्वो EX30 ही कंपनीची आतापर्यंतची सर्वात टिकाऊ इलेक्ट्रिक कार आहे. तिचे इंटिरिअर पुनर्वापर केलेल्या डेनिम, पीईटी बाटल्या, ॲल्युमिनियम, पीव्हीसी पाईप्स यांसारख्या टिकाऊ साहित्यांपासून तयार करण्यात आले आहेत. स्कॅन्डिनेव्हियन डिझाइन व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या या मॉडेलने युरो एनसीएपी सेफ्टी टेस्टमध्ये 5 स्टार प्राप्त केले आहे.
EX30 मध्ये टक्कर टाळण्यासाठी इंटरसेक्शन ऑटो ब्रेक, “डोअरिंग” अपघात टाळण्यासाठी दरवाजा उघडण्याचा इशारा, तसेच 5 कॅमेरे, 5 रडार आणि 12 अल्ट्रासोनिक सेन्सर्ससह सेफ स्पेस टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे.
GST 2.0 चा अलभ्य लाभ! क्लासिक लिजेंड्सच्या आयकॉनिक जावा, येझदी Bikes किंमत 2 लाख रूपयांपेक्षा कमी
EX30 मध्ये NFC कार्डद्वारे अनलॉकिंग, तसेच वॉल्वो कार ॲपमधील डिजिटल की प्लस फीचर उपलब्ध आहे, ज्यामुळे मोबाईल फोनच कारची की म्हणून वापरता येते. यामुळे ग्राहकांचा अनुभव अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होतो.