फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये वाहनांची वाढती मागणी नेहमीच विदेशातील वाहन उत्पादक कंपन्यांना आकर्षित करत असते. तसेच भारतीय ग्राहक सुद्धा विदेशी ऑटो कंपन्यांना दमदार प्रतिसाद देत असतात. Volvo ही युरोपातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे, जी अनेक वर्षांपासून भारतात दमदार वाहनं ऑफर करत आहे. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्ष देत आहे.
भारतात इलेक्ट्रिक कारची मागणी सतत वाढत आहे. आता युरोपियन वाहन उत्पादक कंपनी व्होल्वो लवकरच व्होल्वो EX 30 ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही म्हणून लाँच करू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी त्याची टेस्टिंग घेतली जात आहे. टेस्टिंग दरम्यान, या एसयूव्हीबद्दल कोणती माहिती समोर आली आहे. त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय बाजारात व्होल्वो EX 30 लाँच करण्याची तयारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही एसयूव्ही लाँच होण्यापूर्वी टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे.
भारतीय ग्राहकांना ‘या’ इलेक्ट्रिक कारची भुरळ, मात्र आता मोजावी लागणार जास्त किंमत
रिपोर्ट्सनुसार, ही एसयूव्ही भारतात टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. टेस्टिंग घेतलेल्या युनिटला पूर्णपणे कव्हर करण्यात आले होते. परंतु या कारच्या टेल लाइट्स आणि डिझाइनबद्दल माहिती समोर आली आहे. एसयूव्हीचे डिझाइन नॉर्मलच ठेवण्यात आले आहे. एसयूव्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स देखील दिले जातील.
सध्या कंपनी ही एसयूव्ही अनेक देशांमध्ये ऑफर करत आहे. जिथे ही एसयूव्ही डिजिटल की, 12.3 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ॲपल कार प्ले, एअर प्युरिफायर, मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर, टाइप सी यूएसबी पोर्ट, 360 डिग्री कॅमेरा, पार्क पायलट असिस्ट, ड्रायव्हर अलर्ट सिस्टम, आणि डोअर ओपनिंग अलर्ट यासारख्या फीचर्ससह उपलब्ध आहे.
व्होल्वो EX 30 इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये 69 kWh बॅटरी देण्यात आली आहे, जी आठ तासांत चार्ज करता येते. ही एसयूव्ही एका चार्जवर 407 किलोमीटरची रेंज देते. ऑल व्हील ड्राइव्हसह दिलेल्या मोटरमधून 315 kW पॉवर मिळते.
बजेट तयार ठेवा ! Diwali 2025 पूर्वीच ‘या’ 5 धमाकेदार SUVs होणार लाँच, जाणून घ्या फीचर्स
कंपनीने या एसयूव्हीच्या लाँचिंगबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतु सणासुदीच्या हंगामात ही कार भारतात लाँच केली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे.
व्हॉल्व्हो लाँचच्या वेळी व्होल्वो EX30 च्या किमतीची माहिती मिळेल. परंतु ही एसयूव्ही व्होल्वो EX40 आणि EC40 रिचार्जच्या खालील पोजिशनमध्ये असेल.