फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात हॅचबॅक सेगमेंटने नेहमीच ग्राहकांची पसंती मिळवली आहे. बजेट, मायलेज आणि कॉम्पॅक्ट डिझाइन यामुळे या कार्स अधिकच किफायतशीर ठरतात. यासोबतच इंजिनची कार्यक्षमताही तितकीच महत्त्वाची असते. सध्याच्या अनेक हॅचबॅक कारमध्ये 3-सिलेंडर आणि 4-सिलेंडर इंजिन पर्याय दिले जातात. या बातमीत आपण 4-सिलेंडर इंजिन असलेल्या आणि 10 लाख रुपयांच्या आत उपलब्ध असलेल्या 4 उत्तम हॅचबॅक कारबद्दल जाणून घेणार आहोत.
Maruti Suzuki Eeco झाली अधिकच सुरक्षित ! मिळला ‘हा’ जबरदस्त सेफ्टी फिचर, किती असेल किंमत?
इंजिन: 1.2 लीटर ड्युअलजेट, 4-सिलेंडर पेट्रोल
पॉवर: 89.73 पीएस
टॉर्क: 113 एनएम
गिअरबॉक्स: 5-स्पीड मॅन्युअल/एएमटी
मायलेज: 22.35 किमी प्रति लिटर ते 22.94 किमी प्रति लिटर
किंमत: 6.70 लाख ते 9.92 लाख रुपये (एक्स-शोरूम)
बलेनो ही भारतीय मार्केटमध्ये खूप लोकप्रिय हॅचबॅक आहे, जी अनेक प्रीमियम फीचर्ससह येते. याचे इंजिन केवळ चांगले मायलेज देत नाही तर अतिशय सुरळीत ड्रायव्हिंग अनुभव देखील देते.
इंजिन: 1.2 लीटर ड्युअलजेट, 4-सिलेंडर पेट्रोल
पॉवर: 89.73 पीएस
टॉर्क: 113 एनएम
गिअरबॉक्स: 5-स्पीड मॅन्युअल/एएमटी
मायलेज: 22 किमी प्रति लिटर ते २३ किमी प्रति लिटर
किंमत: 6.90 लाख ते 9.92 लाख रुपये (एक्स-शोरूम)
काय सांगता ! 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास फिटमेंट शुल्काशिवाय ‘HSRP’ बसवून मिळणार
ग्लांझा ही प्रत्यक्षात बलेनोची टोयोटा व्हर्जन आहे. यात टोयोटाची उत्कृष्ट वॉरंटी आणि विश्वासार्ह सेवा नेटवर्क देखील आहे. हे प्रीमियम डिझाइन, उत्तम मायलेज आणि उत्तम ड्राइव्ह क्वालिटीसह येते.
इंजिन: 1.2 लीटर Kappa, 4-सिलेंडर पेट्रोल
पॉवर: 83 पीएस
टॉर्क: 114.7 एनएम
गिअरबॉक्स: 5-स्पीड मॅन्युअल / सीव्हीटी ऑटोमॅटिक
मायलेज: 16 किमी प्रति लिटर ते 20 किमी प्रति लिटर
किंमत: 7.04 लाख ते 11.25 लाख रुपये (एक्स-शोरूम)
Hyundai i20 ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. यामध्ये टेक्नॉलॉजी, फीचर्स आणि स्टाइलचा उत्तम मिलाफ दिसून येतो. त्यात असलेले 4-सिलेंडर इंजिन दमदार परफॉर्मन्स देते, जे शहरात आणि महामार्गावर दोन्ही ठिकाणी उत्तम आहे.
इंजिन: 1.2L, 4-सिलेंडर पेट्रोल
पॉवर: 83 पीएस
टॉर्क: 113.8 एनएम
गिअरबॉक्स: 5-स्पीड मॅन्युअल/एएमटी
मायलेज: 16 किमी प्रति लिटर ते 18 किमी प्रति लिटर
किंमत: 5.98 लाख ते 8.62 लाख रुपये (एक्स-शोरूम)
जर तुम्ही परवडणारी आणि विश्वासार्ह हॅचबॅक कारच्या शोधत असाल जी अनेक उत्तम फीचर्ससह येते. त्यात बसवलेले इंजिन उत्तम परफॉर्मन्स देते. तर मग ह्युंदाई ग्रँड आय10 निओस तुमच्यासाठी परफेक्ट पर्याय ठरेल.