फोटो सौजन्य: @friendshapedcar (X.com)
भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाईल उत्पादकांपैकी एक असलेली मारुती सुझुकी विविध सेगमेंटमध्ये वाहने विकते. उत्पादकाकडून व्हॅन सेगमेंटमध्ये इको ही लोकप्रिय कार ऑफर केली जाते. नुकतेच ही व्हॅन अपडेट करण्यात आली आहे. यामुळे ही कार चालवणे अधिक सुरक्षित झाले आहे. यामध्ये कोणत्या प्रकारचे सेफीत फीचर्स अपडेट करण्यात आले आहेत. ही Maruti Suzuki Eeco किती किमतीत खरेदी करता येणार आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
काय सांगता ! 25 पेक्षा जास्त वाहन मालकांची मागणी आल्यास फिटमेंट शुल्काशिवाय ‘HSRP’ बसवून मिळणार
मारुती सुझुकी व्हॅन सेगमेंटमध्ये इको ऑफर करते. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ही व्हॅन अपडेट करण्यात आली आहे. ज्यामध्ये पूर्वीपेक्षा चांगले सेफ्टी फीचर्स प्रदान करण्यात आले आहेत.
माहितीनुसार, मारुती सुझुकी इको सहा एअरबॅग्ज सारख्या सेफ्टी फीचर्ससह ऑफर केली जात आहे. हा फिचर या व्हॅनच्या सर्व व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय, व्हॅनला आणखी एक अपडेट देण्यात आला आहे. आता दुसऱ्या रांगेच्या जागांवरही कॅप्टन सीट्स दिल्या जात आहेत. यापूर्वी, मधल्या रांगेत सामान्य जागा दिल्या जात होत्या.
मारुती सुझुकीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, आता मारुती सुझुकी इको व्हॅनचा एक व्हेरियंट वेबसाइटवरून काढून टाकण्यात आला आहे. माहितीनुसार, आता ते फक्त पाच आणि सहा सीट्सच्या पर्यायासह दिले जाईल. यापूर्वी ही व्हॅन सात सीट्ससह देखील देण्यात आले होते.
देशातील सर्वात स्वस्त EV झाली अजूनच स्वस्त, आता किंमत असेल फक्त…
मारुती सुझुकी इकोमध्ये 1.2 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन आहे. ज्यामुळे त्याला 60.5 किलोवॅटची शक्ती आणि 105.5 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. यासोबतच, त्यात सीएनजीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे त्याला 52.7 किलोवॅटची शक्ती आणि 95 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. दोन्ही इंजिनसह 5 -स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन दिले आहे.
कंपनीने या कारच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 5.44 लाख रुपये ठेवली आहे. त्याच्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6.70 लाख रुपये आहे.
मारुतीची Eeco ही व्हॅन सेगमेंटमध्ये देण्यात आली आहे. या सेगमेंटमध्ये इतर कोणत्याही कंपनीकडून कोणतेही उत्पादन बाजारात दिले जात नाही. पण किमतीच्या बाबतीत, रेनॉल्ट ट्रायबर सारख्या बजेट एमपीव्हीकडून या व्हॅनला आव्हान मिळते.