फोटो सौजन्य - Social Media
दिवाळीच्या सणामध्ये मोठ्या प्रमाणात लोकं खरेदी करतात. या दिवसात वाहन खरेदीचे प्रमाण फार असते. शहराकडील लोकं जास्त करून स्कूटर घेण्याच्या विचारात असतात. शहरातील रोजच्या दैनंदिन वापरासाठी आणि वाढत्या गर्दीमध्ये स्कूटर मोटारसायकलपेक्षा अधिक सोयीस्कर ठरते. तसेच, स्कूटर मोटारसायकलच्या तुलनेत अधिक किफायतशीर असते. परंतु, यावेळी स्कूटर खरेदी करताना. दोन प्रकार आपल्याला गोंधळून टाकतात. स्कूटर की मॅक्सी स्कूटर कोणता प्रकार घेणे जास्त सोयीस्कर ठरेल? हा प्रश्न बहुतेक जणांना पडत असतो. या प्रश्नाला तुम्हीही त्रासले असाल तर नक्कीच हा लेख तुमच्या उपयोगी पडेल. तसेच तुमचा गोंधळ सोडवण्यास नक्कीच मदतीला येईल.
हे देखील वाचा : Honda ची ‘ही’ बाईक देते लक्झरी कार्सना टक्कर, किंमत Toyota Fortuner पेक्षा जास्त
सध्याची तरुण मंडळी स्कूटरमध्ये मॅक्सी स्कूटरकडे जास्त आकर्षित दिसून येते. कारण आताच्या मुलांना सगळकाही स्टायलिश हवंय. चला तर मग जाणून घेऊयात, यंदाच्या दिवाळीत स्कूटर घेऊ की मॅक्सी स्कूटर? कोणता प्रकार ठरेल जास्त सोयीस्कर…
साधी स्कूटर
साधी स्कूटर भारतात सर्वात जास्त विक्रल्या जाणाऱ्या प्रकारांपैकी एक आहे. याचे इंजन जास्त पावरफूल नसते. साधारणतः १०० ते १२५ सीसीचे इंजिन असणाऱ्या या स्कूटर्स शहरी भागांमध्ये फिरण्यासाठी अधिक उपयुक्त ठरतात. साधी स्कूटर चालवायला सोपी, हलकी, आणि कमी इंधन वापर करणारी असते. वजन कमी असतो त्यामुळे शहरी भागात या प्रकाराची मागणी फार असते. साधी स्कूटर गर्दीतून सोपे आणि सुलभपणे चालवता येते. हंडलिंग आणि मॅन्युव्हरिंगसाठी स्कूटर एकदम योग्य ठरते. साध्या स्कूटरमध्ये पॅसेंजर सीट आणि लहान स्पेस मिळतो, जो दैनंदिन वापरासाठी पुरेसा असतो. तसेच, साध्या स्कूटरचे मेंटेनन्स कमी असते आणि त्यांची किंमतही मॅक्सी स्कूटरच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे नवीन रायडर्स किंवा साध्या वापरासाठी ही योग्य निवड ठरते.
मॅक्सी स्कूटर
स्कूटरचा हा प्रकार थोडा आधुनिक आहे. या स्कूटरचा इंजिन पॉवर स्कूटरच्या तुलनेत अधिक पॉवरफुल असतो. 150CC ते 350CC पर्यंत इंजिन असणाऱ्या मॅक्सी स्कूटर्स मध्ये अधिक स्पेस, आरामदायी सीट, आणि मजबूत इंजिन असते, जे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी एकदम योग्य असते. मॅक्सी स्कूटरची उंच सीट आणि दीर्घ फुटबोर्ड त्यांना आरामदायी बनवतात.
लांब प्रवासासाठी मॅक्सी स्कूटरवर जास्त स्पेस उपलब्ध असतो, त्यामुळे पॅसेंजरसह प्रवास अधिक सुखकर होतो. याशिवाय, मॅक्सी स्कूटर्सची ग्राऊंड क्लिअरन्स अधिक असल्याने, रस्त्याच्या अडथळ्यांना तोंड देणे सोपे होते. जर तुम्हाला ट्रॅव्हलिंग, लांब पल्ल्याचे सफर करणे आवडत असेल, तर मॅक्सी स्कूटर ही एक चांगली निवड ठरू शकते.
हे देखील वाचा : यंदाच्या दिवाळीत फक्त 1 लाखात घरी आणा Maruti Suzuki Ertiga, दरमहा भरा एवढा हप्ता
कोणते निवडावे?
साध्या स्कूटरची निवड म्हणजे रोजच्या दैनंदिन वापरासाठी आणि सोयीसाठी उत्तम पर्याय. यामध्ये कमी बजेटमध्ये उत्तम मायलेज मिळते, त्यामुळे खर्चही कमी होतो. मॅक्सी स्कूटर ही जरा महाग असते, परंतु दीर्घकालीन वापरासाठी अधिक आरामदायी आणि पॉवरफुल ठरते. जर प्रवास आणि आराम तुमच्या प्राथमिकता असतील, तर मॅक्सी स्कूटर योग्य ठरते. दिवाळीमध्ये या दोन प्रकारांतील फायद्यांवर विचार करूनच खरेदी करणे सुज्ञता ठरेल.