भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून वैदिक परंपरा आहे. या परंपरेमध्ये संपूर्ण समाज आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती कोणत्याही जात, पंथ धर्माचा असला तरी प्रत्येक जीवाचे उत्थान व्हावे आणि हयात असेपर्यंत जीवनात परमोच्च अत्यानंदाची अनुभुती घेता यावी या उदेशाने ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. भागवत ग्रंथात केवळ कथा नाहीत, तर भगवंताच्या प्रत्येक कथांमधून प्रत्येक जीवाचा उद्धार कसा करावा, हेच सांगितले आहे. या ग्रंथातून अत्यंत सरळ आणि सोप्या भाषेत मानवजातीला अचूक मार्ग दाखविला आहे. भागवताकडे केवळ कथा म्हणून न पाहता, या कथांचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे आणि आपण त्यातील काय आत्मसात करायचे हे आपल्याला समजायला हवे.