फोटो सौजन्य: @KIAmotorsID (x.COM)
भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार चांगल्या परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करत असतात. किया मोटर्स ही त्यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी.
कियाने देशात विविध सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या अनेक कार्सना ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. Kia Sonet ही त्यातीलच एक लोकप्रिय कार. दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी किया भारतीय बाजारात चार मीटरच्या खाली असलेल्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये सोनेट विक्रीसाठी उपलब्ध करून देते.
जर तुम्ही कंपनीच्या सोनेटचा बेस व्हेरिएंट HTE खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर कार घरी आणू इच्छित असाल, तर तुम्हाला दरमहा किती ईएमआय भरावा लागेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. मात्र, त्यापूर्वी या कारची किंमत जाणून घेऊयात.
1 लाखापेक्षा कमी Down Payment केल्यास Tata Punch होईल का तुमची? असा असेल संपूर्ण हिशोब
कंपनीच्या या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 8 लाख रुपये आहे. जर ही कार राजधानी दिल्लीत खरेदी केली तर RTOसाठी सुमारे 56 हजार रुपये आणि इंश्युरंससाठी सुमारे 37 हजार रुपये द्यावे लागतील. यासोबतच, एसयूव्हीसाठी फास्टॅग आणि इतर चार्जेससाठी सुमारे 7 हजार रुपये द्यावे लागतील. त्यानंतर किया सोनेट HTE ची रोडवरील किंमत सुमारे 9.04 लाख रुपये होते.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट HTE खरेदी केला तर बँक फक्त एक्स-शोरूम किमतीवर कारला फायनान्स करेल. अशा परिस्थितीत, 1 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून सुमारे 8.04 लाख रुपये फायनान्स करावा लागेल. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजदरासह 7 वर्षांसाठी 8.04 लाख रुपये देत असेल, तर तुम्हाला पुढील 7 वर्षांसाठी दरमहा 12940 रुपयांचा EMI भरावा लागेल.
फक्त 5 मिनिटात चार्जिंगवर 400 KM ची रेंज ! Mercedes कडून सर्वात पॉवरफुल इलेक्ट्रिक कार सादर
जर तुम्ही बँकेकडून सात वर्षांसाठी 8.04 लाख रुपयांचे कार कर्ज घेतले आणि त्यावर 9 टक्के व्याजदर दिला तर तुम्हाला 7 वर्षांसाठी दरमहा 12940 रुपयांचा EMI भरावा लागेल. अशा परिस्थितीत, 7 वर्षांत तुम्हाला किया सोनेटच्या बेस व्हेरिएंट HTE साठी सुमारे 2.82 लाख रुपये व्याज द्यावा लागेल. त्यानंतर तुमच्या कारची एक्स-शोरूम, ऑन रोड आणि व्याजासह एकूण किंमत सुमारे 11.86 लाख रुपये असेल.
किया सोनेट ही कॉम्पॅक्ट साइझ एसयूव्ही म्हणून ऑफर करते. कंपनीची ही कार थेट बाजारात Maruti Breeza, Nissan Magnite, Renault Kiger, Kia Syros, Skoda Kylaq, Mahindra XUV 3XO,Tata Nexon, Hyundai Venue, सारख्या सब फोर मीटर एसयूव्हींशी स्पर्धा करते.