फोटो सौजन्य: @MercedesBenzUSA (X.com)
भारतासह जगभरात मर्सिडीज-बेंझने लक्झरी कार ऑफर केल्या आहेत. आज प्रत्येक सेलिब्रेटी आणि उच्च वर्गीय लोकांच्या ताफ्यात मर्सिडीजच्या कारचा समावेश असतोच असतो. यात कंपनीच्या कारची सामान्य वर्गात देखील मोठी क्रेझ पाहायला मिळते.
सध्या सगळीकडेच इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसत आहे. अशातच मर्सिडीज देखील इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. नुकतेच कंपनीने हाय-परफॉर्मन्स डिव्हिजन AMG अंतर्गत एक इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. या इलेक्ट्रिक कारचे नाव Mercedes AMG GT-XX Concept आहे. ही कंपनीची एक अतिशय पॉवरफुल कार असणार आहे. चला, या नवीन कारबद्दल जाणून घेऊया.
Mercedes AMG GT-XX Concept ही हिरो-ऑरेंज शेडमध्ये सादर केली आहे. याची झलक 60 आणि 70 च्या दशकातील C111 कॉन्सेप्ट कार आणि अलीकडील व्हिजन वन-इलेव्हन कॉन्सेप्ट मध्ये पाहायला मिळते. ही चार-दरवाज्यांची इलेक्ट्रिक ग्रॅन टूरर आहे, ज्यामध्ये स्लोपिंग कूप रूफलाइन आहे जे या कारला एक अतिशय स्पोर्टी लूक देते.
अशी ऑफर पुन्हा येणे नाही ! ‘या’ कारवर मिळत आहे 86000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट
या कारच्या पुढच्या बाजूला पॅनामेरिकाना ग्रिल, बोनेट स्कूप, एलईडी हेडलाइट्स आणि स्पोर्टी फ्रंट लिप आहे. साइड प्रोफाइलमध्ये 21-इंच एरोडायनामिक व्हील्स, फ्लश डोअर हँडल आणि स्पोर्टी साइड स्कर्ट आहेत. त्याच्या मागील बाजूस 700 एलईडी सिग्नेचरसह 6 सिलिंड्रिकल 3D टेललाइट्स आहेत. त्याची एरोडायनामिक एफिशियन्सी देखील उत्कृष्ट आहे.
मर्सिडीज एएमजी जीटी-एक्सएक्सएक्स कॉन्सेप्टचा इंटिरिअर पार्ट खूपच फ्यूचरिस्टिक आहे. त्यात नारंगी रंगाचे इल्युमिनेशनचे लायनिंग, 10.2 -इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 14-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, एएमजी स्टीअरिंग योक, पॅडल शिफ्टर्स, कार्बन फायबर बकेट सीट्स, रिसाइकल्ड मटेरिअलचा वापर केलेला आहे.
Honda एका मागोमाग एक अशा 5 पॉवरफुल कार लाँच करण्याच्या तयारीत, EV सोबतच Hybrid Car वर जास्त लक्ष
मर्सिडीज एएमजी जीटी-एक्सएक्स कॉन्सेप्टमध्ये 114 किलोवॅट प्रति तास बॅटरी आहे. यात मर्सिडीज फॉर्म्युला 1 पासून प्रेरित अत्याधुनिक आणि कूलिंग टेक्नॉलॉजी आहे. त्याची 800V आर्किटेक्चर 850 किलोवॅट डीसी चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दावा केला आहे की ते फक्त 5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 400 किमीची रेंज देऊ शकते. त्यात बसवलेली मोटर 1360 बीएचपीची पॉवर जनरेट करते. त्याचा टॉप स्पीड 360 किमी/तास आहे. या कारच्या व्हील्सना पॉवर देण्यासाठी तीन एक्सियल फ्लक्स मोटर्स वापरण्यात आल्या आहेत.
Mercedes कंपनी AMG GT-XX Concept वर आधारित एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. ही एसयूव्ही त्याच प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल आणि 2026 च्या आसपास प्रॉडक्शनसाठी आणली जाऊ शकते.